प्रतिनिधी: अवधुत सावंत
जागतिक दर्जाच्या कमी अवधित जगप्रसिद्ध झालेला खेळ कल्याण-डोंबिवलीकरांना देखील खेळता यावा आणि येत्या ऑलिंपिक मध्ये इथला खेळाडू असावा या उद्देशाने 'डावखर फाउंडेशन' आणि 'रिजेन्सी ग्रुप' यांनी बेलग्रेव स्टेडियम सुरू केले आहे. ज्यामध्ये आठ कोर्ट चार पॅव्हीलिअन्स असणार आहेत. या स्टेडियमचे उदघाटन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
आशियातले सर्वात मोठे पिकल बॉल स्टेडियम हे डोंबवलीत असल्याचा मी एक डोंबिवलीकर म्हणून मला अभिमान
आहे असे उद्गार अभिनेते भाऊ कदम यांनी यावेळी बोलताना काढले व डावखर फाउंडेशनचे संतोष डावखर यांच्या सोबत 'पिकल बॉल' खेळ खेळून सामन्यांची सुरुवात केली. यावेळी 'रिजेन्सी ग्रुप'चे महेश अग्रवाल, संजय गोयल, अनिल भतीजा, विकी रुपचंदनी, दिनेशकुमार बासोरिया, डावखर ग्रुपचे संतोष डावखर, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर देखील या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
आहे असे उद्गार अभिनेते भाऊ कदम यांनी यावेळी बोलताना काढले व डावखर फाउंडेशनचे संतोष डावखर यांच्या सोबत 'पिकल बॉल' खेळ खेळून सामन्यांची सुरुवात केली. यावेळी 'रिजेन्सी ग्रुप'चे महेश अग्रवाल, संजय गोयल, अनिल भतीजा, विकी रुपचंदनी, दिनेशकुमार बासोरिया, डावखर ग्रुपचे संतोष डावखर, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर देखील या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
आजची जीवनशैली पाहता सुदृढ व निरोगी राहण्यासाठी आणि चपळता वाढवण्यासाठी 'पिकल बॉल' हा खेळ देश विदेशात आवर्जून खेळला जातो. उद्घाटनाच्या दिवशी 'डावखर करंडक २०२३' चे आयोजन करण्यात आले होते. ज्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार, दिल्ली, झारखंड मधून खेळाडू या ठिकाणी स्पर्धेसाठी आले होते. 'डावखर करंडक २०२३' मध्ये एकूण १ लाख २५ हजार रुपयांची रोख बक्षिसे आणि पदकं विजेत्या स्पर्धकाला देण्यात आले.
'ओपन मेन्स सिंगल' मध्ये अनुक्रमे कुलदीप महाजन, गौरव राणे, हिमांश मेहता, 'ओपन मेन्स डबल' मध्ये अनुक्रमे तेजस मयूर, वंशिक रोनव, गौरव हिमांश आणि '३५ प्लस मेन्स डबल' मध्ये मिहीर हिमांशु, वैभव विकी, संदीप शैलेश यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले.
सानिया मिरझा विरुद्ध टेनिस खेळणारी नॅशनल खेळाडू ईशा लखानी व हिमांश मेहता आणि बहीण-भाऊ असलेले नॅशनल पिकल बॉल खेळाडू नैमी मेहता व हर्ष मेहता देखील उपस्थित होते व एक प्रात्यक्षिक मॅच खेळून प्रेक्षकांची दाद मिळवली तसेच ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशन अध्यक्ष अरविंद प्रभू है देखील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आले होते.
भारतात या खेळाची आवड निर्माण व्हावी त्यामुळे अल्पदरात प्रवेश असेल आणि सुरुवातीचे काही दिवस मोफत प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक वयोगटात हा 'पिकल बॉल' खेळला जाणार असून प्रत्येक वयोगटातील बेस्ट प्लेयर च्या 'युएस चॅम्पियनशिप' चा पूर्ण खर्च डावखर फाउंडेशन उचलणार आहे अशी माहिती डावखर फाउंडेशनचे संतोष डावखर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. आशियातील सर्वात मोठ्या पिकल बॉल स्टेडियमच्या उद्घाटनाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भामबुरे यांनी केले. संतोष डावखर आणि टीमने विशेष मेहनत घेऊन उद्घाटनाचा कार्यक्रम यशस्वी पार पाडला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा