BREAKING NEWS
latest

'यूएस' शेअर बाजाराच्या घसरणीचा फटका; शेअर्स मार्केटमध्ये दाणादाण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  गेल्या आठवड्यात तेजीत असलेल्या शेअर बाजारात आज आठवड्याच्या शेवटी दाणादाण उडाली आहे. यूएस शेअर बाजारातील घसरणीचा फटका आज मुंबई शेअर बाजाराला बसला आहे. जागतिक संकेतांमुळे यूएस शेअर बाजारात ही घसरण नाेंदवली गेली. आज बीएसई सेन्सेक्स ८५९.१८ अंकांनी घसरला. म्हणजेच १.४४ टक्के घसरला आहे. ५८,९४७.१० वर आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच निफ्टी देखील २३९.२५ अंकांनी घसरला आहे. म्हणजेच १.३६ टक्क्यांनी घसरून १७,३५०.३५ अंकांवर आला आहे. 

शेअर बाजारात प्रामुख्याने अदानी समूहाची प्रमुख कंपनी 'अदानी एंटरप्रायझेस' ५%  आणि 'एचडीएफसी बँक' २% नी घसरली आहे. केअर रेटिंगमध्ये 'अदानी एंटरप्रायझेस'चे रेटिंग स्थिर ते नकारात्मक असे बदल घडले आहेत. तसेच 'एनएसई'ने ते अल्पकालीन देखरेखेखाली ठेवले आहेत. याशिवाय एचडीएफसी बँकेचा डेटा लिक झाल्याची माहिती समाेर आली आहे आणू तशा बातम्या झळकल्या देखील आहेत. बँकेने मात्र याप्रकाराला नकार दिला आहे. या गाेंधळामुळे एचडीएफसी बँकेचे समभाग दाेन टक्क्यांनी घसरले आहेत. अदानी समूहाच्या सूचीबद्ध दहापैकी सात समभाग घसरले आहेत.

मागील सत्रात समूहाचे सहा समभाग उच्चांकी पातळीवर बंद झाले हाेते. त्यापैकी चार समभाग वरच्या वळणावर हाेते. शुक्रवारी बाजार उघडताच 'अदानी ग्रीन एनर्जी' आणि 'अदानी ट्रान्समिशन'चे शेअर्स अपर सर्किटवर पाेहाेचले. याशिवाय 'अदानी टाेटल गॅस'च्या दरातही वाढ नाेंदवली गेली. पण एसीसी, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (एपीएसईझेड), अदानी पॉवर, अदानी विल्मार, अंबुजा सिमेंट्स आणि एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये घसरण झाली. अदानी एंटरप्रायझेसमध्ये सर्वाधिक ५.४४ टक्क्यांची घसरण नाेंदवली गेली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत