प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवलीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शहर कार्यालयात धुळवड वाजत नाचत मोठया आनंदात व जोमात साजरी करण्यात आली. शहर अध्यक्ष राजेश मोरे, संजय पावशे, प्रकाश माने, सागर जेधे, संतोष चव्हाण, सागर बापट, वैभव राणे यांच्यासह महिला कार्यकर्ते व असंख्य शिवसैनिक धुळवड साजरी करण्याकरिता एकत्र येत एकमेकांना नैसर्गिक हर्बल रंग लावून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात नाचत गाजत धुळवडीचा आनंद लुटला.
त्यातच प्रकाश माने यांचा वाढदिवस असल्याने कार्यालयात केक कापून त्यांना शुभेच्छा देत त्यांना नैसर्गिक रंग लावत धुळवडीचा आनंद द्विगुणित झाला. उपस्थित कायकर्त्यांना जिलेबी, पापडी व मसाले दुधाचे वाटप करण्यात आले.
शहराध्यक्ष राजेश मोरे यांना या आनंदाबाबत विचारले असता ते म्हणाले की आपला हिंदूंचा हा सण सप्तसुरांमध्ये व सप्तरंगामध्ये उजळून निघालेला असा सण बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे या धुलीवंदनाच्या विचार आम्ही सर्व डोंबिवलीतील शिवसेना शहर शाखेच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्ते आज धुलिवंदनाचा आनंदाचा सण साजरे करत आहोत. अशी ही परंपरा संपूर्ण भारतभर रहावी त्यामुळे हा आनंदाचा आपला सण धुलीवंदनाच्या माध्यमातून नैसर्गिक हर्बल रंग ज्याने हानी होणार नाही व मद्यप्राशन करून टवाळखोरी व दंगे होणार नाहीत व हा पवित्र सण साजरा करत असताना कोणतेही गालबोट लागणार नाही अश्या पद्धतीने साजरा करत असून तसा एक संदेश लोकांपर्यंत देण्यासाठी एक सामाजिक उपक्रम राबवित असल्याचे एक धारणा असून धर्मवीर आनंद दिघे यांची ही परंपरा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे चालवत असून त्यांच्या माध्यमातून खासदार श्रीकांत शिंदे, गोपाळ लांडगे व आम्ही सर्व कार्यकर्ते दिघे साहेबांची परंपरा पुढेही चालवत राहू असे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा