BREAKING NEWS
latest

महाराष्ट्राच्या खेळाडूंचा क्रीडामंत्री गिरीश महाजन व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून खेळाडुंचा सत्कार व कौतुक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत  

  नुकत्याच तामूलपूर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गुवाहाटी (आसाम) येथे सपन्न झालेल्या ४ थ्या आशियाई अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद मिळवत भारतीय खेळाडूंनी भारताचे नाव उज्ज्वल केले.  मुंबई येथे आशियाई खो-खो स्पर्धेत खेळलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडुंचे महाराष्ट्राचे क्रीडामंत्री गिरीश महाजन व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते, भारतीय संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडु अक्षय भांगरे, अनिकेत पोटे, सुयश गरगटे, अपेक्षा सुतार, प्रियांका इंगळे, गौरी शिंदे, निकिता पवार, प्रशिक्षक महेश पलांडे, डॉ. अमित रावेट यांचा सत्कार करण्यात आला या वेळी डॉ. चंद्रजित जाधव, ऍड. गोविंद शर्मा , सुरेंद्र विश्वकर्मा, पंकज दळवी, तुषार मोरे, विजय बनसोडे उपस्थितीत होते.
 यावेळी महाराष्ट्राचे क्रीडामंत्री गिरीश महाजन व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या खेळाडुंचे कोडकौतुक तर केलेच व त्याचवेळी या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुध्दा दिल्या. तसेच भविष्यात महाराष्ट्राचे व भारताचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचे सुचविले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत