BREAKING NEWS
latest

सरकार स्थिरतेच्या सुप्रीम निकालासाठी श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरात संकल्पपूर्ती व महाआरतीचे आयोजन..

 

प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र राज्यातील सत्ता संघर्षात  मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे विद्यमान सरकार व शिवसेने संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सकारात्मक निर्णयानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा पिंपळेश्वर मंदिर ट्रस्टचे सचिव पंढरीनाथ पाटील यांनी केलेल्या संकल्पानुसार आज शुक्रवारी प्राचीन तीर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे संकल्पपूर्ती अभिषेक तसेच एका भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, शिवसेना जिल्हा संघटक, माजी नगरसेवक तथा कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख महेश पाटील, कल्याण ग्रामीण सचिव बंडू पाटील, श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष  मोहन पाटील, उपसचिव अरुण पाटील, उपाध्यक्ष रतन म्हात्रे, सदस्य सुरेश पाटील, कल्याण तालुका संघटक अर्जुन पाटील, शिवसेना डोंबिवली उपशहर प्रमुख सुनील भोसले, उपशहर संघटक  संतोष तळाशीकर, विभाग प्रमुख अमोल पाटील, उप-कार्यालय प्रमुख धर्मराज शिंदे, माजी नगरसेविका डॉ. सुनिता पाटील, प्रकाश माने, युवा सेनेचे जिल्हा पदाधिकारी योगेश म्हात्रे, रवी मट्या पाटील, रवी अंबो म्हात्रे,  दिपाली स्वप्निल पाटील, उमेश पाटील, विभाग प्रमुख अनिल म्हात्रे, सचिन म्हात्रे, ऍड. स्वप्निल पंढरी पाटील,  डोंबिवली शहर व कल्याण ग्रामीण क्षेत्रातील अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक बंधू भगिनी श्रद्धापूर्वक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर हे जागृत देवस्थान आहे. याचा सहा वेळा मला अनुभव आला होता. यंदा देखील मी केलेल्या संकल्पनुसार माझी इच्छा पूर्ण केली. म्हणून मी अभिषेकाचे आणि शिवसेनेच्या वतीने महाआरतीचे आयोजन केले होते असे पंढरीनाथ पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत