प्रतिनिधी: अवधूत सावंत
डोंबिवली येथील खंबाळपाड्यातील भाजपचे माजी नगरसेवक साई शिवाजीदादा शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त खंबाळपाडा येथील त्यांच्या कार्यालयात मोफत शासकीय दाखले वाटप मेळाव्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. सुमारे ५०० लाभार्थ्यांनी या मेळाव्यात नोंदणी केली. विशेषतः 'आयुष्यमान भारत' (आभा) या आरोग्य कार्डासाठी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी करून घेतली. माजी नगरसेविका शिल्पाताई शेलार, साई शेलार, डोंबिवली भाजपचे युवा नेते सिध्दार्थ शेलार, वाॅर्ड अध्यक्ष चिंतामण पाटील, समाजसेविका स्वरा साई शेलार यावेळी उपस्थित होते.
वास्तव्याचा दाखला, डोमेसाईल, जातीचा दाखला व आयुष्यमान भारत अशा दाखल्यांसाठी मोफत मेळाव्याचे आयोजन सकाळपासून करण्यात आले होते. कार्यशील नगरसेवक साई शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध समाज उपयोगी उपक्रम ठेवण्यात येतात. यावर्षी देखील मोफत शासकीय दाखले वाटप मेळाव्याचे आयोजन कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आयुष्यमान भारत' योजनेविषयी धडाकेबाज निर्णय घेतला आहे. त्याचा सुद्धा लाभ स्थानिक नागरिकांना व्हावा याकरिता या कार्डाची नोंदणी लाभार्थ्यांसाठी करण्यात आली. असे भाजपचे वॉर्ड अध्यक्ष चिंतामण पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. सर्व प्रकारच्या दाखल्यांसाठी लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या नोंदणीसाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले होते. दिलीप भंडारी, विनायक गायकवाड आणि इतर कार्यकर्ते यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी अपार मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा