राज्यातील नगरपरिषद संवर्गातील अभियंत्यांना राज्य शासनाच्या इतर विभागांप्रमाणे वेतनश्रेणी देण्यासंदर्भात नेमलेल्या संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती नेमण्यात आली आहे. समितीचा अहवाल प्राप्त होताच त्या अनुषंगाने कार्यवाही केली जाईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. सदस्य कालिदास कोळंबकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले.
राज्यातील नगरपरिषद संवर्गातील अभियंत्यांना इतर विभागांप्रमाणे वेतनश्रेणी देण्याच्या अनुषंगाने सविस्तर अभ्यास आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्याने याप्रकरणी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त होताच त्या अहवालातील निष्कर्षानुसार या प्रकरणी तातडीने निर्णय घेण्यात येईल असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर स्पष्ट केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा