बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील समृद्धी महामार्गावर खाजगी लक्झरी बस रस्त्यालगतच्या कठड्याला धडकून झालेल्या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला होता. हे सर्व मृतदेह बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ठेवण्यात आले होते मृतकांची ओळख पटणे हे जिकरीचे काम झाले होते डीएनए टेस्टच्या माध्यमातून या मृतदेहाची ओळख पटवल्या जाणार आहे , दरम्यान या यातील २४ मृतदेहांवर आज सामुहिकरित्या दाहसंस्कार करण्यात आला.
असे सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय मृतकांच्या नातेवाईक आणि शासनाच्या वतीने घेण्यात आला तर एका मुस्लिम महिलेची ओळख त्यांच्या नातेवाईकांनी पटवून त्या महिलेचा मुस्लिम धर्म पद्धतीने दफनविधी साठी तिच्या मृतदेह त्यांच्या नातविकांच्या सुपूर्द करण्यात आला. बुलडाण्यात आज येथील हिंदू स्मशान भूमी मध्ये सकाळी १२:३० वाजता या सर्व मृतदेहांवर सामुहिक रित्या अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून एकाच वेळी २४ मृतदेहांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेमध्ये मृतकांचे नातेवाईक सहभागी झाले होते. यावेळी मृतकांच्या नातेवाईकांचा आक्रोश हा मन हे लावणारा होता. स्मशानभूमी मध्ये २४ ही मृतदेहांवरचा धार्मिक विधी पार पडला, त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी अग्नी दिला. अंत्ययात्रेमध्ये राज्य शासनाच्यावतीने मंत्री गिरीश महाजन, खासदार प्रतापराव जाधव, वर्धा खासदार रामदास तडस यांच्यासह लोकप्रतिनिधी, बुलडाणेकर नागरिक सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा