प्रत्येक नागरिकाने शाडू मातीच्याच गणेश मूर्तीचा वापर करावा अशी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कठोर नियमावली जारी केली आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टी आयोजित पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले. कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख नंदू परब यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनास ग्रामीण मंडळ संघटन सरचिटणीस श्री. सूर्यकांत माळकर, जिल्हाध्यक्ष वाहतूक संघटनेचे दत्ता मळेकर, वॉर्ड ८५ चे अध्यक्ष संतोष शुक्ला, मूर्तिकार सचिन तूपगावकर व त्यांचे सहकारी तुलसीदास वाघ, समीर देशमुख तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
शाडूची मूर्ती वजनदार जरी असली तरी आपण पर्यावरण राखण्यासाठी शाडूच्याच मूर्तीचा वापर करावा व प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती वापरू नये. ती विरघळण्यास बराच कालावधी लागतो. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. त्यासाठी जनतेमध्ये जनजागृती व्हावी म्हणून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा रविवारी ग्रामीण मंडळाच्या वतीने डोंबिवली एमआयडीसीतील सुदामा नगर येथील गणेश मंदिर शेजारील भाजपा ग्रामीण मंडल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले. यावेळी नागरिकांना पर्यावरण विषयक संदेश देण्यात आला. जवळपास शंभर ते दीडशे मुलं-मुलींनी या कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदवला. शाडूच्याच गणेश स्मृतीचा वापर करावा असे आवाहन भाजप ग्रामीण मंडळाच्या वतीने सर्वत्र करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा