BREAKING NEWS
latest

अखेर विधानसभेला मिळाला विरोधी पक्षनेता..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या एक महिन्यापासून रिक्त असलेल्या विरोधी पक्षनेते पदाची माळ काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्या गळ्यात पडली आहे. अधिवेशन संपण्यासाठी दोन दिवस असताना ही निवड झाली आहे. विजय वडेट्टीवार यांच्या निवडीबद्दल सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्ष आमदारांनी अभिनंदन प्रस्तावात कौतुक केले आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काँग्रसेचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा सभागृहात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार आणि पक्षाचे आठ आमदार २ जुलै रोजी एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. वडेट्टीवार यांची या पदावर नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि विरोधी पक्षनेत्यांनी काँग्रेसच्या नेत्याला विरोधी पक्षनेत्याच्या जागेवर नेले. त्यांना खुर्चीवर बसवण्यापूर्वी अजित पवार यांनी त्यांना कोषागार बाकांजवळ नेले. त्यानंतर सत्ताधारी व विरोधी दोन्ही बाजूंच्या आमदारांमध्ये हशा पिकला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की वडेट्टीवार यांची निवड काही प्रमाणात उशीरा झाली आहे. आम्ही वडेट्टीवारांशी हात मिळविले. पण काही जण घाबरले, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

वडेट्टीवार हे मुळचे शिवसेनेचे अत्यंत झुंजार नेते असून त्यांचे अभिनंदन करतो. ते विरोधी पक्षनेते पदाला योग्य न्याय देतील, असा विश्वास असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदनपर प्रस्तावात म्हटले. विरोधी पक्षनेते पद मिळणे ही एक संधी जो या खूर्चीवर (विरोधी पक्षनेते पद) बसेल तो तिकडे (सत्ताधारी गटात) जातो, असा टोला जयंत पाटील यांनी अजित पवार यांना लगावाला. त्या खूर्चीवर काहीतरी पूजा केली पाहिजे. कोणती पूजा करायला हवी, हे मुख्यमंत्री शिंदे यांनाच विचारा, असा टोलादेखील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. अभिनंदनपर प्रस्तावात अजित पवार म्हणाले, की पूर्वी विदर्भात शिवसेना नव्हती. विजय वडेट्टीवार शिवसेनेत असताना त्यांनी पक्ष वाढविला.

विरोधी पक्षनेते पद मिळणे ही एक संधी असून सन्मानाचे पद आहे. ते पदाला योग्य न्याय देतील, अशा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. चंद्रपुरात मोठ्या आवाजाची स्पर्धा विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की विदर्भाचा बुलंद आवाज म्हणजे वडेट्टीवार आहेत. विदर्भातील प्रश्न त्यांनी आक्रमकपणे मांडले आहेत. यापूर्वी त्यांची शिवसैनिक म्हणून ओळख होती. वडेट्टीवार यांचा आवाज माईकपेक्षा जास्त आहे. ते मैत्री जपणारे नेते आहेत. चंद्रपुरात मोठ्या आवाजाची स्पर्धा आहे, अशी कोपरखळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना मारली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत