'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ऍनिमल्स' (पेटा) या संस्थेने उंदीर पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्ल्यू ट्रॅप वर बंदी घातली आहे. उंदीर पकडण्यासाठी अनेक ठिकाणी ग्ल्यू ट्रॅप वापरले जातात. यात उंदीर चिकटतात आणि अडकतात. मात्र ग्ल्यू ट्रॅपमुळे फक्त उंदीर नाही तर अन्य प्राण्यांना देखील त्रास होत आहे. ग्लू ट्रॅपमुळे आतापर्यंत फक्त उंदीरच नाही तर साप, सरडे देखील अडकले आहेत. त्यामुळे या ग्लू ट्रॅपबाबत पेटाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या ग्ल्यू ट्रॅपमध्ये साप, सरडे इतकंच काय घुबडही अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. 'पेटा'ने यांसंबंधी तक्रार केली होती, त्यानुसार सरकारने या ग्ल्यू ट्रॅपवर बंदी घातली आहे.
'पेटा'ने याबाबत म्हटलं की, प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा, १९६० च्या कलम ११ चे ग्लू ट्रॅप उल्लंघन करतो. ग्लू ट्रॅपला असलेला गम जास्त प्रमाणात चिकट असतो. उंदीर जेव्ह यामध्ये अडकतो तेव्हा त्यातून निसटने त्याला कठीण होते. परिणामी उंदीर तेथे चिकटून मरतात. तसेच अन्य प्राणी देखील ग्लू ट्रॅपमध्ये अडकून मृत्यू पावत आहेत.
उंदीर पकडण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय उपलब्ध आहेत. त्यामुळे ते पर्याय वापरून उंदीर पकडावेत. उंदीर पकडण्यासाठी मिळणाऱ्या लाकडी पिंजऱ्याचा वापर करावा. ग्लू ट्रॅपमध्ये सापांसह पक्षी देखील चिकटतात. पक्षांपासून माणसाला काही त्रास नसतानाही अनेक पक्षी या ग्लू ट्रॅपला अडकले आहेत. त्यामुळे ग्लू ट्रॅपवर बंदी घालण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा