BREAKING NEWS
latest

२९ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस

आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस
रोहन दसवडकर
 
ध्याच्या युगात इंटरनेट हे प्रत्येकासाठी महत्वाचे शस्त्र बनले आहे. माहिती ते मनोरंजन हा प्रवास इंटरनेटच्या सहाय्याने करता येतो. इतकेच नव्हे तर शेकडो लोकांसाठी उत्पन्नाचे साधन इंटरनेट बनले आहे. 
आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस दरवर्षी 29 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. इंटरनेटच्या सहाय्याने चार्ली क्लाइने 29 ऑक्टोबर 1969 रोजी पहिला संदेश पाठवला होता. म्हणून 29 ऑक्टोबर ला आंतरराष्ट्रीय इंटरनेट डे म्हणून ओळखले जाते.

आज असे एकही क्षेत्र नाही जिथे इंटरनेटचा वापर केला जात नाही , इंटरनेट मुळे कोणतीही माहिती क्षणात उपलब्ध होते . इंटरनेट हा आजच्या काळात सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे , मानवी जीवनातील सर्वात मोठी प्रगती म्हणजे इंटरनेट , इंटरनेट मुळे संपूर्ण जग जवळ आले आहे , लहान मुले- मुली ते मोठ्यापर्यंत सर्वजण इंटरनेटचा वापर करतात , इंटरनेट मुळे अगदी एका क्षणात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात माहिती पोहोचवणे शक्य झाले आहे . 

असे असले तरी ह्या इंटरनेट च्या विश्वात वावरताना त्याचे फायदे तोटे लक्षात घेणे आपल्यासाठी फार गरजेचे आहे
फायदे -
१) इंटरनेटच्या सहाय्याने ई-मेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तत्काळ संदेश पाठविता येतो.
२) इंटरनेटच्या साह्याने कमी वेळामध्ये अधिक कार्य करता येते.
३) इंटरनेट मुळे कोणत्याही माहितीची उपलब्धता सहज शक्य झाली आहे.
४) इंटरनेटमुळे ऑनलाईन व्यवहार सहज शक्य झाले आहेत.
५) इंटरनेटच्या साह्याने घरबसल्या खरेदी-विक्री करणे सहज शक्य झालं आहे.

तोटे -
१) इंटरनेटमुळे माहितीच्या गोपनीयतेचा अभाव जाणवतो.
२) सोशल मीडियाच्या आगमनानंतर इंटरनेट हे लोकांसाठी व्यसन झाले आहे. दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ लोक इंटरनेटवर घालवू लागले.
३) इंटरनेट हे पोर्नोग्राफीला प्रोत्साहन देते: इंटरनेटने बर्याच वर्षांपासून पोर्नोग्राफीला प्रोत्साहन दिले आहे. एक्स-रेटेड चित्रपट बहुतेक निवडलेल्या इंटरनेट साइट्सवर उपलब्ध आहेत जे नैतिकतेचे प्रमाण कमी करतात.

इंटरनेट चे फायदे किंवा तोटे जरी असले तरी आपल्याला त्याचा कसा फायदा होईल ह्याच दृष्टीने आपण त्याचा वापर केला पाहिजे. इंटरनेटचा शिक्षणासाठी उपयोग हा आपल्या भारतासारख्या प्रगतशील देशासाठी एक वरदान आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. विविध क्षेत्रात होणारे संशोधन येथील संशोधनाला अधिक प्रेरणा देऊ शकेल. आरोग्याच्या क्षेत्रातही इंटरनेटचा वापर भविष्यकाळात फार प्रभावीपणे होऊ शकेल.

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत