डोंबिवली : फिर्यादी हर्षद भारत सरवदे रा. तेलखाडा, ता. वाशी, जि. धाराशीव हे दि. १४/११/२०२३ रोजी सकाळी ०६:४५. च्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील चिमणी गल्लीतील राजु वडापाव दुकानाजवळ, चहा पित असताना त्यांच्या ओळखीचा अक्षय उर्फ सोनू दाते व त्याचे दोन साथीदार यांनी त्यांना "तु मला काळ्या का म्हणालास" असे बोलून त्यांच्याशी भांडण करून त्यांना शिवीगाळ व दमदाटी करून त्यांना हाताच्या ठोश्याबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपींने त्यांचे जवळ असलेला चाकु फिर्यादीच्या गळ्यास लावून त्याच्या कडील २६००/- रूपये रोख रक्कम जबरीने काढून घेतले बाबत डोंबिवली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ४४३/२०२३ भादंवि. कलम ३९४, ३९७, ५०४, ५०६, ५०६ (२), ३४ प्रमाणे दि. १४/११/२०२३ रोजी २१:०१ वाजता दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण कडून समांतर तपास करण्यात येत असताना दि. १५/११/२०२३ रोजी पोलीस अंमलदार सचिन वानखेडे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पोनिरी, राहुल मस्के व पथकाने सापळा रचुन डोंबिबली पूर्वेकडील दत्तनगर चौकातील प्रगती कॉलेज जवळ १८:२५ वाजता इसम नामे १) अक्षय उर्फ सोनू किशोर दाते (वय: २२ वर्षे) रा. स्वतःचे घर, त्रिमूर्ती वसाहत, स.वा.जोशी विद्यालयाच्या मागे, छेडा क्रॉस रोड, डोंबिवली (पूर्व) २) रोहीत अनिल भालेराव (वय:२३ वर्षे) यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत ताब्यात घेतले आहे. नमुद दोन्ही गुन्हेगार अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार असून त्या दोघांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात बरेच गुन्हे दाखल आहेत. तसेच यातील आरोपी अक्षय उर्फ सोनू किशोर दाते यास मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आलेले आहे.
सदर कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पंजाबराव उगले, मा.पोलीस उप आयुक्त (गुन्हे), शिवराज पाटील, मा.सहा. पोलीस आयुक्त, निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक -३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पो.निरी. राहुल मस्के, सहा. पो. निरी. संतोष उगलमुगले, पोलीस उप निरीक्षक संजय माळी, पो.हवा.अनुप कामत, बापुराव जाधव, पो.ना. सचिन वानखेडे, दिपक महाजन, पो.कॉ.रविंद्र लांडगे यांनी यशस्वीपणे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा