BREAKING NEWS
latest

'ग्लोब बँक्वेट हॉल' चे उद्घाटन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: दि.०५. 'ग्लोब ग्रुप' तर्फे डोंबिवली एमआयडीसी परिसरातील प्रशस्त अश्या 'ग्लोब बँक्वेट हॉल' चे उद्घाटन राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कोनशीला व गणेश पूजन करून फीत कापून तसेच दीप प्रज्वलित करून पार पडले. या प्रसंगी बँक्वेट हॉल चे संचालक माधव सिंग यांनी ना. रविंद्र चव्हाण यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, मानाचा फेटा प्रदान करत गजांतलक्ष्मी ची मूर्ती भेट देऊन स्वागत केले. डोंबिवलीचा सर्वबाजूने जो विकास सुरू आहे तो जोराने चालू असून सर्वोतोपरी नामदार रवींद्र चव्हाण यांच्यामुळे सुरु असून त्याच्यात काही वावगं नाही असे बोलत मी डोंबिवलीत १९४२ साली आलो व शिक्षण मराठीत आदर्श विद्यालयात झालेले असून एक डोंबिवलीकर आहे त्या उद्देशाने डोंबिवलीकरांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने सगळं उत्तम सुरू आहे असे ते म्हणाले.
नामदार रवींद्र चव्हाण यांना दोन शब्द बोलण्यास सांगितले असता त्यांनी सर्वांना हात उंच करून 'भारत माता की जय, वंदे मातरम' ची जयघोषणा देऊन 'ग्लोब बँक्वेट हॉल' च्या प्रसंगी जमलेल्या डायरेकटर्स, सर्वेसर्वा तसेच डोंबिवलीतील विविध क्षेत्रामधील नामांकित मान्यवर उपस्थितांना उद्देशून ग्लोब च्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या संधी या डोंबिवलीकरांना नेहमीच उपलब्ध करून देत असल्याचे आपल्या सर्वांना ज्ञात असल्याचे बोलून दाखविले. मध्यमवर्गीय डोंबिवलीकरांना योग्य आणि माफक दरामध्ये चांगलं असं काही मिळावं या दृष्टिकोनातून सातत्याने ग्लोब समूह प्रयत्न करत असतात तसेच वाढत्या डोंबिवलीची लोकसंख्या पाहता शहराच्या मध्यभागी असा सुशोभित 'बँक्वेट हॉल' उपलब्ध करन देण्यात आल्याने नामदार रवींद्र चव्हाण यांनी 'ग्लोब बँक्वेट हॉल' चे संचालक माधव सिंग, ग्लोब समूह आणि त्यांच्या परिवाराची स्तुती आणि कौतुक केले.
या प्रसंगी डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, मनसे आमदार राजू पाटील यांनी उद्घाटन समारंभाला आपली उपस्थिती आवर्जून लावत माधव सिंग आणि त्यांच्या परिवाराला या उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा दिल्या. भाजपा माजी नगरसेवक राहुल दामले, मुकुंद पेडणेकर, मनसे चे राजन मराठे, ज्योती मराठे हे या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.

बँक्वेट हॉल उभारण्याच्या मागचं मोठं कारण
खरं तर बँक्वेट हॉल उभारण्याच्या मागचं मोठं कारण काय तर डोंबिवलीतील शहरात जिथे बँक्वेट हॉल आहेत तिथे पार्किंगची मोठी समस्या असून पार्किंग मिळत नसून ते महागडे सुद्धा आहेत. तर आम्ही हॉल ची उंची मोठी उभारून कमी दरात चांगल्या आधुनिक अश्या सुख सुविधा उपलब्ध करून देऊन हॉल मधील इंटीरयर चांगल्या प्रकारचे केले आहे विशेष हॉल चं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही दोन हॉल केलेले आऊन पुढचा हॉल मोठा असून साधारण ५५० ते ६०० माणसांची बसायची क्षमता असून जर कोणाला ९०० ते १००० लोकांचा समारंभ असेल तर अगदी सहजरित्या करता येऊ शकेल आणि मागचा छोटा हॉल आहे तो साधारण ३०० माणसांची बसायची क्षमता असून जर कोणाला ५०० ते ५५० लोकांचा समारंभ असेल तर तोही अगदी सहजरित्या करता येऊ शकेल. डोंबिवलीकरांचे एव्हढे प्रेम आहे माझ्यावर की ज्या ग्लोबचे आम्ही जे काही प्रकल्प करतो ते चालू होताच २५ ते ३० टक्के बुकिंग तात्काळ होऊन जातं. ज्या दिवशी ओपन केलं त्या ३ दिवसात पुढील महिन्यातील १५ बुकिंग मिळाल्या त्यामुळे मी मनापासून डोंबिवलीकरांना आणि उपस्थित पत्रकारांना धन्यवाद देत असल्याचे माधव सिंग यांनी म्हटले.

हॉल किफायती कसा ?
हॉल किफायती कसा या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना संचालक माधव सिंग म्हणाले की हॉल मध्ये इंटिरिअर सारख्या मूलभूत सुविधा ज्या असाव्या लागतात त्या आम्ही पुरवल्या असून खर्च जो काय असतो तो डेकोरेशन आणि जेवणावर केला जातो. आम्ही ४ प्रकारच्या प्लेट्स दिल्या आहेत जेवण वगैरे रोज जे करतात त्याप्रमाणे आणि डेकोरेशन हे त्यांना वेगळे असे करावे लागत नसल्यामुळे आमचा हा बँक्वेट हॉल इतरांपेक्षा किफायती पडतो असे ग्लोब बँक्वेट हॉल चे संचालक माधव सिंग यांनी प्रसिध्दी माध्यमांना सांगितले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत