कल्याण: कल्याण सारख्या वाढत्या लोकवस्तीच्या शहरात पूर्वेकडील चक्कीनाका येथील स्कायलॉन बिल्डिंग,नेतीवली येथे सुसज्ज असं १०० बेड्सचं अत्याधुनिक असं 'अमेय मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल' उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.
या उद्घाटन प्रसंगी निमंत्रक माजी आमदार, महाराष्ट्र विधानपरिषद अध्यक्ष, अखिल भारतीय औषध विक्रेता महासंघ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता महासंघ चे जगन्नाथ शिंदे (अप्पा), मा.नगरसेवक निलेश शिवाजी शिंदे, रुपाली निलेश शिंदे, डॉ.कुलदीपक जगन्नाथ शिंदे, डॉ.रेणू कुलदीपक शिंदे, डॉ.अभिजित रमेश ठाकूर, डॉ.फ्लेविया अभिजित ठाकूर, डॉ.राजेंद्र रामशरण केसरवाणी, प्रणिता राजेंद्र केसरवाणी, कमलेश संतोष ठाकरे, डॉ.चारू कमलेश ठाकरे, विक्रांत जगन्नाथ शिंदे, राजेश्वरी विक्रांत शिंदे, राजेंद्र लिंगायत यांनी पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत केले.
उपस्थितांसमोर बोलताना प्रथम डॉ.श्रीकांत शिंदे यांनी हॉस्पिटल च्या संचालकांना शुभेच्छा दिल्या व म्हणाले की कल्याण स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण स्टेशन रि-डेव्हेलॉपमेंट प्रकल्प जो ८०० कोटींचा महत्वकांक्षी प्रकल्प असून कल्याण पूर्वेकडून स्टेशनपर्यंत सरळ मार्गे जात येत नाही खूप अडथळे येऊन लोकांना पायपीट करावी लागते तर हा प्रकल्प सुरू झालेला असून पुढील दोन वर्षात तुम्ही गाडी घेऊन थेट स्टेशन येथे पोहोचू शकाल त्याकरिता जी काही भविष्यात होणारी कामं आहेत ती मंजूर झालेली असून काही वेळ व कालावधी लागतो तर पत्रिपुल मध्ये कोणीच यायला तयार नव्हतं पण मी स्वतः तिथे एकट्याने उभे राहून माझा मतदारसंघ असल्याने जबाबदारीने तो पूल लवकरात लवकर पूर्णत्वास नेऊन सुरू केला. सगळ्यांनी जर एकत्र येऊन राजकारण न करता सकारात्मकतेने काम केलं तर कामे लवकर होतात त्याचं उदाहरण म्हणून अंबरनाथ मध्ये सगळे रस्त्यांचे शंभर टक्क्याने काँक्रीटीकरण करून झाले असून अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर च्या सुशोभीकरणाकरीता दीडशे कोटी रुपये मंजूर करून काम सुरू आहे. काशीच्या धर्तीवर्ती अंबरनाथचं हजार वर्ष पुरातन शिव मंदिर जसं काशी कॉरिडॉर झाला तसं लवकरच अंबरनाथ येथील शिवमंदिराला स्वरूप येईल व लाखो भाविक भक्तगण हे अंबरनाथ मध्ये दर्शनाला येतील असे डॉ.श्रीकांत शिंदे म्हणाले.
उद्घाटनाला विशेष उपस्थिती म्हणून ना.कपिल पाटील केंद्रीय पंचायत राज्यमंत्री, रविंद्र चव्हाण मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच प्रमुख पाहुणे विश्वनाथ भोईर (आमदार, कल्याण पश्चिम), गणपत गायकवाड (आमदार, कल्याण पूर्व), किसन कथोरे (आमदार, मुरबाड), प्रमोद (राजु) पाटील (आमदार, कल्याण ग्रामीण), डॉ.बालाजी किणीकर (आमदार, अंबरनाथ), प्रकाश भोईर (मा. आमदार, कल्याण पश्चिम), नरेंद्र पवार (मा. आमदार, कल्याण पश्चिम), भाऊसाहेब दांगडे (भाप्रसे) (आयुक्त, कडोंमपा), राजेंद्र शिरसाठ (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी), सचिन पोटे (कांग्रेस जिल्हाध्यक्ष), नरेंद्र (नाना) सुर्यवंशी (भाजपा जिल्हाध्यक्ष), गोपाळ लांडगे (शिवसेना जिल्हाप्रमुख) प्रामुख्याने उपस्थित होते.
या उद्घाटनाला विशेष अतिथी म्हणून मा. नगरसेवक मल्लेश शेट्टी, नितीन मट्या पाटील, नवीन गवळी, महेश गायकवाड, कुणाल पाटील, मोरेश्वर भोईर, रमेश जाधव, शरद पाटील, प्रशांत काळे, अर्जुन नायर, मनोज राय, देवानंद गायकवाड, राजाराम पावशे, विक्रम तरे, मोनाली तरे, माधुरी काळे, राजवंती मढवी-शेट्टी, श्रीमती सुमन निकम, सुशिला माळी, संगिता गायकवाड, स्नेहल पिंगळे, सारिका जाधव आवर्जून उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा