डोंबिवली : डोंबिवली भाजप पश्चिम मंडलातर्फे "संविधान दिन" साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमानिमित्त सकाळी ९.०० वाजता 'द्वारका हॉटेल' ते 'सम्राट चौक' पश्चिम संविधान रॅली काढण्यात आली.
संविधान रॅली ची सांगता झाल्यानंतर सकाळी १०.०० वाजता वक्ते एन.एस.भालेराव यांजकडुन देशाच्या संविधानासंदर्भात उपयुक्त असं मार्गदर्शन करण्यात आले. सकाळी ठीक ११.०० वाजता राज्याचे सन्माननीय बांधकाम मंत्री तसेच आमदार रविंद्र चव्हाण यांच्या सम्राट चौक येथील जनसंपर्क कार्यलयामध्ये भाजप पश्चिम मंडलाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक यांजकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन-की-बात' कार्यक्रम पाहण्यात आला. सदर 'मन-की-बात' कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित भारतीय लष्करातील सेवानिवृत्त माजी अधिकारी तसेच पोलीस प्रशासनातील माजी अधिकारी यांच्या उपस्थितीत देशसेवा करणाऱ्या अधिकारी वर्गाला समर्पित करण्यात आला.
या प्रसंगी समीर चिटणीस यांच्यासह भाजप पश्चिम सरचिटणीस अमोल दामले, दिलीप धुरी, उपाध्यक्ष दिनेश।जाधव, महिला अध्यक्षा रेखाताई असोदेकर, युवा मोर्चा अध्यक्ष मनिषजी शिंदे, सरचिटणीस अमोलजी पाटील, तसेच भाजप पश्चिम मंडलाचे इतर पदाधिकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा