डोंबिवली दि.११ : टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३५ वर्षांच्या फिर्यादी महिला दि. ०६/१०/२०२३ रोजी दुपारी ०३:०० वाजता पत्रीपुलाच्या बाजुला असलेल्या होमबाबा टेकडीवर होमबाबा दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी पायी जात असतांना एका निर्जन ठिकाणी आरोपी अमीर मलंग शेख हा सदर ठिकाणी येवुन त्याने फिर्यादी महिलेचा विनयभंग करून तिच्या गळ्यातील ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र खेचुन पळुन गेला. याबाबत टिळकनगर पोलीस ठाण्यात दिनांक ०६/१०/२०२३ रोजी गुन्हा रजि. क्रमांक २५२/२०२३ कलम मा.द.वि.क. ३५४, ३५४(ब), ३५४(ड), ३९४, ५०६ प्रमाणे आरोपी अमीर शेख नावाच्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्यातील संवेदनशिलता व गांभीर्य लक्षात घेवुन मा. वरिष्ठांच्या आदेशान्वये विविध पथके तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू केला गेला. तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र मेहनत करून तांत्रीक व गोपनिय माहितीच्या आधारे दि. ०९/१२/२०२३ रोजी आरोपी अमीर मलंग शेख (वय: २९ वर्षे), रा. हनुमान नगर, होमबाबा टेकडी, संतोष नगर, पत्रीपुलच्या मागे, कल्याण (पुर्व) यास वांगणी, बदलापुर येथुन ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यात अटक केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
वरील गुन्हा उघडकीस आणण्याच्या कारवाईत मा. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, मा. सचिन गुंजाळ, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-३ कल्याण, मा. सुनिल कुराडे, सहा. पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग, मा. कल्याणजी घेटे, सहा. पोलीस आयुक्त, कल्याण विभाग, कल्याण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उमेश गित्ते टिळकनगर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिंदे, पोउपनि शेख, सपोउपनि सोनावणे, पोहवा कांबळे, पगारे, पोशि राठोड, राजपुत, सपकाळे यांनी अथक परिश्रम घेवुन सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा