डोंबिवली : डोंबिवलीतील जिया जगदीश भानुशाली ही मुंबईतील सोमय्या महाविद्यालयात शिकते. जिया स्विमिंग शिकण्यासाठी डोंबिवलीतील यश जिमखाना मध्ये प्रशिक्षक विलास माने यांच्याकडे आली. जियाने बेसिक स्वीमिंग शिकून ऍडव्हान्स कोचिंग चे वर्ग लावले.
जिया ने एक ते दोन महिन्यातच स्ट्रोक शिकून मालवण चीवला बीच येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिने यश जिमखानामध्ये सराव चालू केला. महिन्यातून एक ते दोन वेळेस उरण ला संतोष सर यांच्याकडे समुद्रात सराव घेतला. शनिवार १६ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत ५ किलोमीटरमध्ये ५ वा क्रमांक जियाने पटकावला. समुद्रात तिला छोटे छोटे मासे चावत होते. समुद्रातून ५ किमी. वरून बाहेर किनारा दिसत नव्हता. पहिल्यांदाच समुद्रात स्पर्धेत उतरली होती. अंतर मोठे होते, मनात थोडी भीतीही होती.
जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर तिने ५ किलोमीटर अंतर सहज पार केले. यश जिमखाना स्टाफ व प्रशिक्षक विलास माने व रवी नवले यांनी जियाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस तिला शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा