BREAKING NEWS
latest

रोटरी क्लब तर्फे सेवा सप्ताह अंतर्गत 'स्त्री शक्ती दिन' म्हणून साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : दिनांक पाच डिसेंबर हा दिवस रोटरी क्लब तर्फे सेवा सप्ताह अंतर्गत स्त्री शक्ती दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने 'रोटरी क्लब ठाणे' आणि 'रोटरी क्लब ठाणे ग्रीन स्पॅन्स' यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री शक्तीवर एक कार्यक्रम आयोजित केला गेला. ठाण्यातील इतर दहा रोटरी क्लब हे या कार्यक्रमाचे सह आयोजक होते. कार्यक्रमाचं घोषवाक्य होतं. "स्त्री समाजस्य कुशल वास्तुकारा" ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद रोटरी क्लब च्या डिस्ट्रिक्ट ३१४२ च्या फर्स्ट लेडी सौ. माधवी मिलिंद कुलकर्णी यांनी भूषवलं व विशेष अतिथी होत्या सौ. परिषा प्रताप सरनाईक. जवळजवळ ८० महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या आणि त्याचा लाभ घेतला. तसेच रोटरी क्लबचे अनेक सदस्य व मान्यवरही याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुलेंवरील पाच ओव्यांनी झाली. सावित्रीबाई फुले यांचा स्त्री सक्षमीकरणाच्या प्रवासातील महत्त्वाचा वाटा लक्षात घेऊन त्यांना त्या ओव्यांद्वारे मानवंदना देण्यात आली. आणि त्यानंतर स्त्री शक्तीच्या उत्सवाला सुरुवात झाली. आजच्या स्त्रिया ह्या बऱ्याचशा प्रमाणात सबल आहेत. स्त्री सबलीकरणाचा आज पर्यंतचा प्रवास आणि ह्या पुढील प्रवासासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे, असं सेवा सप्ताहच्या संचालक मनिषाताई कोंडुसकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
 स्त्रियांच्या जीवनाशी निगडित तीन विषयावर विचार मंथन झालं. "नेतृत्वगुण" याविषयी श्रीमती लता सुब्रेडू यांनी मार्गदर्शन केले. एसीपी प्रिया मच्छिंद्र ढाकणे यांनी "स्त्रियां विषयक त्यांचे हक्क व कायदे" याविषयीची माहिती दिली आणि श्रीमती राजश्री परब "आर्थिक नियोजन व स्वास्थ्य" याविषयी बोलल्या. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून माधवीताई कुलकर्णी यांनीही त्यांचं मनोगत व्यक्त केलं व विशेष अतिथी परिषाताई सरनाईक यांनीही स्त्री जीवनाविषयी काही महत्त्वा चे विचार मांडले.

ह्या स्त्री शक्ती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरियन शिरीन तुलालवार ह्यांनी केले, तर या संपूर्ण कार्यक्रमाची संरचना रोटरी डिस्ट्रिक्ट सेवा सप्ताहचे समन्वयक डॉ. निलेश जयवंत यांनी केली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत