डोंबिवली दि.०३ : देशातील विविध राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांपैकी मध्यप्रदेश, राजस्थान तसेच छत्तीसगड या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल भारतीय जनता पश्चिम मंडलातर्फे द्वारका चौक येथे जमून विजयोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी पश्चिम मंडल पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी द्वारका चौक ते भाजप पश्चिम मंडल कार्यालयापर्यंत विजयी रॅली काढून घोषणा देत नागरिकांना मिठाई वाटप केले. आयोजित सदर विजयोत्सवाला नागरिकांनी देखील आपला सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याप्रसंगी भाजप पश्चिम मंडल अध्यक्ष समीर चिटणीस, उपाध्यक्ष हरीश जावकर, सरचिटणीस अमोल दामले, बाळा परब, दिनेश जाधव, महिला अध्यक्षा रेखाताई असोदेकर, महिला सरचिटणीस ज्योती पाटील, रुचिता चव्हाण, मंडल उपाध्यक्षा गीता नवरे, श्वेता धोपटे, शोभा सावंत, गुजराती आघाडी अध्यक्ष जुगलज उपाध्याय, अनुसूचित मोर्चा अध्यक्ष राजेंद्रजी खरात, उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष शशिधरजी शुक्ला, माजी मंडल अध्यक्ष प्रदिप चौधरी तसेच पश्चिम मंडलाचे इतर पदाधिकरी व कार्यकर्ते मोठ्या या रॅली मध्ये मोठ्या संख्येने जल्लोषात उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा