BREAKING NEWS
latest

अल्टीमेट खो-खोच्या सीझन दोन मध्ये मुंबई खिलाडीसचा राजस्थान वॉरियर्सवर रोमहर्षक असा पहिला विजय..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

भुवनेश्वर, ३१ डिसेंम्बर: आज झालेल्या सामन्यात तेलुगू योद्धासने ओडिशा जगरनॉट्सवर १ गुणाने निसटता विजय मिळवला, तर मुंबई खिलाडीसने राजस्थान वॉरियर्सवर १ गुणाने रोमहर्षक विजय साजरा केला. हे सामने अल्टीमेट खो-खोच्या सीझन दोन मध्ये कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर झाले. आजच्या सामन्यामध्ये दिपेश मोरे व श्रीजेश एस ला अष्टपैलू खेळाडूंचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

कालपर्यंत झालेल्या बाराव्या सामन्यापर्यंत चेन्नई क्विक गन्सचा रामजी कश्यप १०.२३ मि. संरक्षण, ४० गुणांसह संरक्षण, आक्रमणात तसेच आकाषीय सूर मारण्यात (१२ वेळा) व सूर मारून बाद करण्यात (२६ गुण)  अल्टीमेट खो-खो सीझन २ सध्या प्रथम क्रमांकावर आहे. चेन्नईचाच दुर्वेश साळुंके वजीर म्हणून २४ गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. स्तंभात खेळाडू बाद करणे या प्रकारात मुंबई खिलाडीसचा अनिकेत पोटे (६ वेळा), सहज स्पर्शाने बाद करण्यात मुंबईचाच गजानन शेंगाळ (२० गुण) प्रथम क्रमांकावर आहे.   

आज झालेल्या तेराव्या सामन्यात तेलुगू योद्धासचा ओडिशा जगरनॉट्सवर २९-२८ (मध्यंतर १४-१५) असा १ गुणाने निसटता विजय मिळवला. गतविजेत्या ओडिशा जगरनॉट्सला मध्यंतराला मिळालेल्या एक गुणाची आघाडी कामी आली नाही. ओडिशा जगरनॉट्सने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले व तेलुगू योद्धासला आक्रमणासाठी आमंत्रित केले. 
आज झालेल्या सामन्यात तेलुगू योद्धासने ओडिशा जगरनॉट्सवर जोरदार खेळी करताना विजय साजरा केला. पहिल्या टर्नमध्ये ओडिशा जगरनॉट्सच्या ओंकार सोनवणे १.२० मि संरक्षण दिपेश मोरे १.४० मि. संरक्षण व बी. निखीलने ड्रीम रन्सचा १ गुण मिळवून दिला, रोहन शिंगाडेने (१.२२ मि. संरक्षण) ड्रीम रन्सचे १ गुण मिळवून दिला, तर तेलुगू योद्धासच्या रुद्र थोपटेने ६ गुण मिळवले. तर दुसऱ्या टर्न मध्ये तेलुगू योद्धासच्या प्रतिक वाईकर १.५५ मि. संरक्षण, आदित्य गणपुले २.२६ मि. संरक्षण व ड्रीम रन्सचे ४ गुण मिळवून दिले, ४.४२ मिनिटात पहिली तुकडी बाद झाली. अवधूत पाटील व ध्रुवचे संरक्षण उत्कृष्ट झाले. तर ओडिशाच्या गौतम एम.के व दिपक साहूने चार-चार गुण मिळवून दिले. 

मध्यंतरानंतर तिसऱ्या टर्न मध्ये ओडिशा जगरनॉट्सच्या अविनाश देसाईचे एक मि. पेक्षा जास्त संरक्षण केले. तर पहिली तुकडी अडीच मिनिटात बाद झाली. तर दुसरी तुकडी १.१५ मिनिटात बाद झाली. तर तेलुगू योद्धासच्या प्रतिक वाईकरने आक्रमणात ६ गुण मिळवले. तर शेवटच्या व चौथ्या टर्न मध्ये तेलुगू योद्धासच्या किरण वसावेने १.२० मि. संरक्षण केले, अरुण गुणकीने एक मि. पेक्षा जास्त संरक्षण करून ड्रीम रन्सचा १ गुण मिळवून दिला. प्रसाद राडियेने दीड मिनिटा पेक्षा जास्त संरक्षण केले.  या सामन्यात प्रतिक वाईकरला उत्कृष्ट आक्रमक, आदित्य गणपुले उत्कृष्ट संरक्षक तर दिपेश मोरेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आजचा दुसरा व एकूण चौदावा सामना मुंबई खिलाडीस व राजस्थान वॉरियर्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबई खिलाडीसने राजस्थान वॉरियर्स वर ३१-३० (मध्यंतर १४-१३) असा १ गुणाने निसटता विजय मिळवला. या सामन्यात राजस्थान वॉरियर्सच्या विजय हजारेने उत्कृष्ट संरक्षण केले. तर वृषभ वाघने ड्रीम रन्सचा १ गुण मिळवून दिला तर मुंबईच्या पी. शिवा रेड्डीने ४ गुण मिळवून दिले. दुसऱ्या टर्न मध्ये मुंबई खिलाडीसच्या हृषिकेश मुर्चावडेने जवळजवळ १.५० मि. संरक्षण केले,  प्रतिक देवारे व सिबीन एम यांनी ड्रीम रन्सचे २ गुण मिळवले. मध्यंतराला मुंबईने १४-१३ अशी १ गुणाची निसटती आघाडी घेतली होती.

मध्यंतरानंतर राजस्थान वॉरियर्सच्या सौरभ गाडगेने १.१५ मि. पेक्षा जास्त संरक्षण केले, निलेश पाटीलने १ गुण मिळवून दिला तर दुसरी तुकडी सव्वा मिनिटात बाद झाली. मुंबई खिलाडीसच्या पी. शिवा रेड्डीने व श्रीजेश एसने आक्रमणात प्रत्येकी ४-४ गुण मिळवून दिले. तर शेवटच्या व चौथ्या टर्न मध्ये मुंबईची पहिली तुकडी सव्वा दोन मिनिटात बाद झाली. दुसरी तुकडी सुध्दा बाद झाल्याने सर्व दारोमदार तिसऱ्या तुकडीवर येऊन पडली व ती त्यांनी यशस्वी पणे पार पाडत ड्रीम रन्सचे ३ गुण मिळवत रोमहर्षक विजय साजरा केला. यात श्रीजेश एसने दोन ड्रीम रन्सचे गुण मिळवून दिले. शेवटच्या क्षणापर्यंत दोलायमान अवस्थेत असलेला हा सामना अखेर मुंबईने जिंकला. राजस्थानच्या  निलेश पाटीलने ६ गुण मिळवले तर दिलराजसिंग सेंगर ४ गुण मिळवत कडवी लढत दिली. या सामन्यात निलेश पाटीलला उत्कृष्ट आक्रमक, सुशांत हजारेला उत्कृष्ट संरक्षक तर श्रीजेश एसला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

सोमवारी पहिला सामना गुजरात जायंट्स व चेन्नई क्विक गन्स यांच्यात तर दुसरा सामना राजस्थान वॉरियर्स व तेलुगू योद्धास यांच्यात रंगेल. खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने अमित बर्मन यांनी अल्टीमेट खो-खो स्पर्धा सुरु केली असून हे सर्व अल्टीमेट खो-खो चे सामने दररोज सायंकाळी ७.३० पासून 'सोनी स्पोर्ट्स नेटवर्क' चॅनेल व 'सोनी लीव' ऍपवर थेट पहाता येतील.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत