जपानमध्ये नवीन वर्षाच्या दिवशीच भूकंपाच्या धक्क्यांमुळे २४ लोकांचा मृत्यू झाला. भूकंपामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी आगीही लागल्या आहेत. सोमवारी जपानमध्ये एकापाठोपाठ एक असे १५५ भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचे अद्याप मूल्यांकन सुरू आहे. यासोबतच एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये भूकंपानंतर खराब झालेले रस्ते आणि मेट्रो स्टेशनची स्थिती दाखवण्यात आली आहे.
भूकंपाचे धक्के व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केले
सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओ मध्ये भूकंपापासून वाचण्यासाठी लोक घराबाहेर पळताना दिसत आहेत. रस्त्यांना खड्डे पडल्याने नागरिक सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. भूकंपाचे धक्के इतके जबरदस्त होते की मेट्रो स्टेशनही हादरले.
भूकंपाच्या १५५ धक्क्यानंतर त्सुनामीचा इशारा
जपानमध्ये, तीनपेक्षा जास्त तीव्रतेचे १५३ भूकंप मोजले गेले आहेत. या दोन धक्क्यांची तीव्रता ७.६ आणि ६ इतकी होती. भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या इमारती कोसळल्या. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) ने म्हटले आहे की होन्शुच्या मुख्य बेटावरील इशिकावा प्रांतात झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.५ रिष्टर स्केल इतकी होती. त्याचवेळी जपानी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की इशिकावा येथील भूकंपाची तीव्रता ७.६ रिष्टर स्केल इतकी होती. जपानच्या हवामान संस्थेने १५५ भूकंपानंतर सुनामीचा इशारा दिला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की त्यांचे प्रशासन जपानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि जपानी लोकांना आवश्यक ती मदत देण्यासाठी तयार आहे. उंच लाटांच्या शक्यतेमुळे किनारपट्टी भागातील रहिवाशांना त्यांच्या घरी परतण्यास मनाई करण्यात आली आहे. देशभरातून हजारो लष्कराचे जवान, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस अधिकारी नुकसानग्रस्त भागात पाठवण्यात आले आहेत. धावपट्टीला तडे गेल्याने विमानतळ बंद करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा