डोंबिवली दि.१३: गेल्या आठ वर्षापासून दर आठवड्याला प्रकाशित होत असलेले साप्ताहिक 'आपला भगवा' या वृत्तपत्राच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या यादीवरील 'क' वर्गातील साप्ताहिक 'आपला भगवा' असून गेल्या आठ वर्षापासून डोंबिवली येथे अखंडितपणे अविरत सुरू आहे. 'आपला भगवा' या वृत्तपत्राच्या कार्यालयाचे उद्घाटन दिनांक १३ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख व जिल्हा समन्वयक महेश पाटील यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महेश पाटील यांनी आपले मत मांडताना सांगितले की कल्याण डोंबिवलीमध्ये अलौकिक नाव करणाऱ्या साप्ताहिक 'आपला भगवा' वृत्तपत्राने उंच शिखर गाठले असून वृत्तपत्राच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर मा. नगरसेवक विश्वनाथ राणे, मा. नगरसेवक संजय पावशे यांनी देखील वृत्तपत्राच्या पुढील वाटचालीस साप्ताहिक 'आपला भगवा' व 'राजमुद्रा टाईम्स' वृत्तपत्राच्या संपादिका सारिका शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक नामवंत कलाकार, समाजसेवक, कवी, पत्रकार बंधू आदी मान्यवर कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा