डोंबिवली: "ऑपरेशन ऑल आऊट" अभियानाअंतर्गत दि. ३०/१२/२०२३ रोजी गुन्हे शाखा घटक-३, कल्याण च्या पोलीसांनी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अधिकारी व अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत खाजगी वाहनातुन गस्त करीत असताना पोकाँ गोरक्ष रोकडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक अनोळखी इसम काटई नाका, काटई गांव, डोंबिवली पूर्व येथे चोरीची ऑटो रिक्षा क्रमांकाची खाडाखोड करून ती आपलेजवळ बाळगुन उभा आहे. अशा खात्रीलायक मिळालेल्या बातमीवरून सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन संशयीत इसम दिनेश जयवंत शिंगोळे (वय: ३१ वर्षे) रा. समर्थ कृपा चाळ, रूम नं. ०२, चाळ नं. ०५, बालगुरू शाळेसमोर, भालगांव ता. अंबरनाथ, जि. ठाणे यास चोरीच्या ऑटोरिक्षासह ताब्यात घेवुन त्याच्याकडे चौकशी करून केलेल्या तपासात त्याच्याकडुन मुंब्रा व पंतनगर, मुंबई येथुन चोरी केलेल्या व त्या ऑटोरिक्षाच्या मुळ क्रमांकास खाडाखोड केलेल्या एकुन ३ ऑटोरिक्षा व १ मोबाईल फोन असा एकुन २,०२,०००/- रूपये किमतीचा मुदद्देमाल जप्त करून त्या रिक्षांचे मुळ क्रमांक निष्पन्न करून नमुद १) मुंब्रा पो. स्टे. गुन्हा रजि. क्र. ३५८/२०१९ भा.दं.वि.कलम ३७९, २) पंतनगर पो. स्टे., मुंबई गुन्हा रजि.क्र. १०१६/२०२२ भा.दं. वि. कलम ३७९, ३) पंतनगर पो. स्टे, मुंबई गुन्हा रजि.क्र. १४८/२०२३ भा.दं. वि. कलम ३७९ प्रमाणे एकुन ३ गुन्हे शिताफीने उपडकिस आणले आहेत. सदर आरोपीस गुन्ह्याच्या पुढील तपासकामाकरिता मिळून आलेल्या मुद्देमालासह मुंब्रा पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
प्रस्तुत यशस्वी कामगिरी मा.पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा.शिवराज पाटील, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे व मा.निलेश सोनावणे सहा.पोलीस आयुक्त, (शोध-१), गुन्हे, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सपोनि, संदिप चव्हाण, पोउनि. संजय माळी, पोहवा.विश्वास माने, प्रशांत वानखेडे, अनुप कामत, पोना. दिपक महाजन, पोकाँ.गोरक्ष शेकडे, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड यांनी केलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा