डोंबिवली: अयोध्येत दिनांक २२ जानेवारी रोजी मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असून त्या दिवशी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत सर्व मद्यविक्री तसेच मटणं, चिकन व मासे विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात यावी असे पत्र शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांच्याकडे देत तशी मागणी केली आहे.
२२ जानेवारी रोजी अयोध्या येथील मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असुन संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात ही उत्साही वातावरण असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची तशी मागणी असून त्याबाबत शहराध्यक्ष राजेश मोरे यांना विचारले असता ते म्हणाले की आपल्या या संपूर्ण भारतभर २२ तारखेला एक आनंदाचा असा क्षण आहे. त्यादिवशी प्रभू श्रीरामचंद्र यांची अयोध्येतील मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात येत असून तो सोहळा म्हणजे दिवाळीसरखा सण आणि त्याहीपेक्षा दुप्पट म्हणून साजरा करण्यात येणार असून त्यादिवशी संपूर्ण भारतभर मंगलमय वातावरण असणार आहे, कारण प्रभू श्रीरामचंद्र १४ वर्षाचा वनवास भोगून अयोध्येत परतले होते तेव्हा अयोध्येत दिवाळी साजरी करण्यात आली होती. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ही सुसंस्कृत असलेलं शहर आहे तर आपल्याला पण काहीतरी केलं पाहिजे त्या अनुषंगाने कल्याण-डोंबिवली च्या आयुक्तांना तसे पत्र दिलेलं आहे. पत्रव्यवहार करून त्यात त्यांनी म्हटले आहे की कल्याण-डोंबिबली महापालिकेच्या हद्दीत जेव्हढे मटणं विक्रेते असतील, मच्छिमार विक्रेते असतील, जेव्हढी मद्यपान करण्याची ठिकाणे असतील विक्रीची दुकाने, बार असतील तर आपल्या देवाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा असून या एका दिवसासाठी तरी बंद ठेवावीत. कुठल्या ही प्रकारचा मांसाहार होऊ नये अशी महापालिका आयुक्तांकडे डोंबिवलीचे शहराध्यक्ष राजेश मोरे यांनी मागणी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा