डोंबिवली: दि. १८/०१/२०२४ रोजी कल्याण गुन्हे शाखा घटक-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून हिललाईन पोलीस ठाण्याचे हदद्दीतील कुंभार्ली गावापासुन सुमारे एक ते दिड किलो मिटर अंतरावर असलेल्या शेतातील झाडाझुडपात, मोकळ्या जागेत बेकायदेशीररित्या गावठी दारू तयार करण्यासाठीची हातभट्टी चालु असताना छापा टाकण्यात आला. छापा कारवाईत १०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये सुमारे ८० लिटर गावठी हातभटट्टीची दारू, २०० लिटर क्षमतेच्या ६० प्लास्टिक ड्रममध्ये एकुन १२,००० लिटर गावठी दारू बनविण्यासाठी लागणारा वॉश व दारू गाळण्यासाठी लागणारी साधने असा एकुण ७,४०,१००/- रूपये किमंतीचा प्रोव्हीबीशन गुन्ह्याचा मुद्देमाल मिळाला असुन तो जागीच नाश करण्यात आला. बेकायदेशीर गावठी दारू बनविण्याची हातभट्टी चालविणारा अज्ञात इसमाचा शोष चालु असुन त्याचे विरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८५/२०२४ मुंबई प्रोव्हीबीशन कायदा कलम ६५ (ब) (क) (ई) (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखा, घटक-३, चे सहा.पो.निरीक्षक संदिप चव्हाण करीत आहेत.
सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पंजाबराव उगले, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, मा.सहा.पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सहा.पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण, पो.हवा. विश्वास माने, दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, अनुप कामत, विलास कडु, चा.पो.हवा. अमोल बोरकर यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा