BREAKING NEWS
latest

आमदार भास्कर जाधवांना संतोष जैतापकर यांनी दिला जोरदार धक्का..

आमदार भास्कर जाधवांना संतोष जैतापकर यांनी दिला जोरदार धक्का...

गुहागर विधानसभा मतदार संघातील खेड तालुक्यातील उबाठा गटातील (भास्कर जाधव समर्थक ) बेलवाडीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थिती मधे केला भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश
गुहागर तालुक्यात सुद्धा लवकरच संतोष जैतापकर भास्कर जाधवाना देणार जोरदार धक्के

 भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष,  संतोषजी जैतापकर यांच्या कामावर प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश*

गुहागर -भारतीय जनता पार्टी मध्ये खेड तालुका मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये अनेक लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला आहे. ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष जेतापकर यांच्या कामावर प्रेरित होऊन तसेच  सचिन चाळके, संकेत हुमणे व बाळू पाटील यांच्या प्रयत्नाने सदरचे प्रवेश करण्यात आले आहेत . मंत्री रविंद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थिती मध्ये गुहागर विधानसभा मतदार संघातील खेड तालुक्यातील धामणदेवी गावातील बेलवाडी मधील नागरिकांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केल्याने भारतीय जनता पार्टीचे गुहागर विधानसभेमध्ये ताकद वाढली आहे.

यावेळी प्रवेश करते वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना व त्यांनी भारताचा परदेशामध्ये बहुमान वाढवले असल्याने,
महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे राज्यातील विकास काम बघून व रविंद्र चव्हाण साहेब यांचे कोकणावरील प्रेम बघून आम्ही प्रवेश करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. आज प्रवेश केलेल्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
प्रवेश केलेल्या नागरिकांची नावे...
श्री संदिप साळवी, संदेश खेराडे, प्रमोद मेने, अदित्य साळवी, अक्षय मेणे, अशिष गोवळकर, महेश गोवळकर, मनोहर गोवळकर, गोपीनाथ साळवी, गंगाराम गोवळकर, कल्पेश साळवी, अनिल गोवळक, सुनिल गोवळकर, त्रतीक साळवी, तेजस मेणे, प्रदिव मेणे, अक्षय मेणे, रवी कांबळी, बंड्या गोवळकर, सचिन गोवळकर, प्रविण मेण, करण साळवी, शुभम साळवी, दिपक साळवी, दिलीप साळवी, राहुल साळवी, विघनेश साळवी, पांडुरंग गोवळकर, रोहीत गोवळकर इत्यादी नागरिकांनी प्रवेश केला. 

यावेळी माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्याबरोबर व्यासपीठावर,
अतुल काळसेकर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, कुद्रुमती मॅडम प्रदेश महीला मोर्च्या सरचिटणीस,  शैलेंद्र दळवी कोंकण विभाग संघटक मंत्री, भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी आमदार विनय नातू व जिल्हाध्यक्ष उत्तर रत्नागिरी केदार साठे उपस्थित होते. 
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत