डोंबिवली दि.२९ : डोंबिवलीतील पीऍण्डटी कॉलोनी मधील रॉयल इंटरनॅशनल शाळा व ज्युनिअर महाविद्यालयात यंदा १० व्या वर्षी 'आयरीस २०२४' प्रदर्शन भरविण्यात आले असून त्यात १३० प्रकल्प प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले असून ४०० पेक्षा अधिक मुलांनी यात आपला सहभाग नोंदवला आहे.यावर रॉयल इंटरनॅशनल शाळेचे व ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष वॅनिल शाह यांनी सर्वप्रथम 'आयरिस २०२४' च्या १० व्या वर्षात सर्वांचे स्वागत करत हे प्रदर्शन सतत १० व्या वर्षी भरवण्याची मान आम्हाला मिळत असून ही आमच्यासाठी सन्मानाची आणि गौरवाची बाब आहे. ज्यामध्ये विविध शाळेतून लोकं व मुलं येतात. यंदा च्या वर्षी १३० प्रकल्प प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले असून ४०० पेक्षा अधिक मुलांनी यात सहभाग घेतला आहे.
यात खास वैशिष्ट्य असे आहे की यंदा फक्त कल्याण-डोंबिवली विभागातलीच नसून तर संपूर्ण ठाणे, नवी मुंबई, घाटकोपर पासूनची मुलं या प्रदर्शनाला भेटी देत आहेत. यातून आमचा उद्धेश फक्त एकचं असून मुलांना एक मंच उपलब्ध करून देणे आहे. ज्यात मुलांना नुसते पुस्तकी ज्ञान अवगत करून फक्त त्यावरच अवलंबून न राहता आपल्या अनुप्रयुक्ती स्तराचा वापर करून या सध्याच्या युगात कला व तांत्रिकी ज्ञान सुद्धा आवश्यक असणे गरजेचे असल्याचा एक प्रयत्न आम्ही करत आहोत.
यात मुलांना आम्ही एक दृष्टिकोन देऊ इच्छितो की आपण फक्त या प्रकल्पापुरता मर्यादित न राहता त्याला आपल्या विचारांनी चालना देत पुढे घेऊन जाणे व त्याला एक दिशा देण्याचे कार्य 'आयरीस' (इनिशिएटिव्ह टू रिसर्च इनवोकेशन टू सोशल आर्ट) कार्यशाळेच्या माध्यमातून करता येऊ शकेल. हे प्रदर्शन दोन दिवसाकरिता भरविण्यात आले असून त्याला भेट देण्यासाठी तसेच हे प्रदर्शन पाहण्यासाठी किमान २००० हुन अधिक मुलं येण्याची शक्यता अपेक्षित आहे. आम्ही ५० शाळा तसेच ५० महाविद्यालय यांना हे 'आयरीस २०२४' प्रदर्शन पाहण्यासाठी निमंत्रित केले असून उत्कृष्ट प्रकल्पासाठी आकर्षक पारितोषिके ठेवल्याचे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले तसेच वेळातवेळ काढून बहुसंख्य लोकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या ज्ञानात भर घालावा असे आव्हान केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा