डोंबिवली : दि. १६/०१/२०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी भाविन अमृतलाल संगोई, (वय: ४९ वर्षे), धंदा: नोकरी, राहणार: रूम नं. १०३, अंकुर पुरुषोत्तम सोसायटी, मॉर्डन प्राईड हॉटेलच्या बाजुला, टाटा पॉवर लाईन, डोंबिवली पूर्व यांच्या राहत्या घरातील आदिनाथ गृह जिनालय मंदिरातुन, तसेच श्री पार्श्वगज जैन संघ चॅरीटेबल ट्रस्ट मंदिर, गुरू मावली बिल्डींग, रामनगर, डोंबिवली पूर्व व शांतीलाल जैन मंदिर, पन्हाळगड बिल्डींग, मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व अशा ०३ जैन मंदिरांतून एका अनोळखी इसमाने उघड्या दरवाज्या वाटे प्रवेश करून मंदिरांतील २ चांदीची फुले, एक चांदीचा नारळ, एक चांदीची आरतीची थाळी, एक चांदीचा दिवा, एक चांदीचा कलश असे एकुण १५७० ग्रॅम वजनाच्या एकुण ९५,०००/- रू. किंमतीच्या चांदीच्या वस्तु चोरून नेल्या म्हणुन अज्ञात चोरट्याविरुध्द फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून डोंबीवली पोलीस ठाणे गु.र.नं ७९/२०२४ भादंवि क. ३८० प्रमाणे दि. २०/०१/२०२४ गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये तांत्रिक पुराव्याचे आधारे चिकाटीने पाठपुरावा करून कौशल्यपुर्ण तपास करत गुन्हा दाखल झाल्यानंतर १२ तासाच्या आत सदरचा गुन्हा उघडकीस आणला असुन त्यात एका आरोपीस अटक करून चोरीस गेलेला माल हस्तगत करण्यात आला आहे. अटक आरोपीचे नाव नरेश अगरचंद जैन, (वय: ४७ वर्षे), राहणार: रूम नं. १७, राधाकृष्ण बिल्डींग, खेतवाडी गल्ली नं. ४, गिरगांव, मुंबई यास दिनांक २१/०१/२०२४ रोजी पहाटे ०५:२९ वा. अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सदर गुन्हयातील ८०,०००/- रू. किंमतीची, १०९८.२० ग्रॅम वजनाची ९९.९ टंचाची, चांदीची लगड हस्तगत करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यातील अटक आरोपी हा जैन मंदिरांमधील चोरी करणारा अट्टल सराईत आरोपी असुन त्याअनुषंगाने सखोल तपास करता त्याच्या विरूध्द मुंबईमधील काळाचौकी, एलटी मार्ग, सायन, आग्रीपाडा, आझाद मैदान, मलबार हिल, घाटकोपर, डी एन नगर, बोरीवली पोलीस ठाण्यामध्ये एकुण ९ गुन्हे दाखल आहेत. सदर नमुद आरोपी हा जैन मंदिरांमध्ये पुजा करण्याचे बहाण्याने प्रवेश करून चोरी करीत असल्याचे निष्पन्न झालेले आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप-आयुक्त सचिन गुंजाळ, मा. सपोआ, डोंबीवली विभाग सुनील कुराडे, मा. वपोनि नितीन गिते, मा. पोनि (गुन्हे) आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबीवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि बळवंत भराडे, पोहवा. सुनिल भणगे, विशाल वाघ, सचिन भालेराव, तुळशीराम लोखंडे, पोना. हनुमंत कोळेकर, पोअं शिवाजी राठोड यांनी यशस्वीपणे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा