डोंबिवली: सध्या राजकीय परिस्थितीतील समस्यावर विरोध करा व्यक्तीवर नको. कुणी कोणाच्या श्रद्धास्थानांची टिंगल टवाळी करू नये. घडणाऱ्या गोष्टी घडतचं असतात त्या आपण नाकारू शकत नाही. सत्याचा शोध घेणे आपलं कामच आहे. सरकार व जनता यांना भावना कळण्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' वृत्तपत्र सुरु केले होते. त्यामुळेच आज आपण येथे आहोत असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार व दैनिक प्रहार चे संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी डोंबिवली येथे पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य आणि सहकारी आणि 'प्रेस असोसिएशन कल्याण-डोंबिवली' आयोजित पत्रकार दिनाचा कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवली येथील शास्त्री हॉल येथे आज ८ जानेवारी रोजी करण्यात आले होते. ८ जानेवारी रोजी माझ्या पत्रकारितेस ५१ वर्षे पूर्ण झाली. लेखन, वाचन, मनन व चिंतन मी करतो. दीपक, टिळक व भरतकुमार राऊत यांच्या प्रेरणेने दैनिक सामना वर संशोधन करून मी पीएचडी गेल्या वर्षी केली आहे. पत्रकारितेत प्रामाणिक राहिल्यास सर्व काही शक्य आहे, हल्ली चॅनेल व पेपरमध्ये मालकांची भांडवल गुंतवणूकदारांची भूमिका महत्वाची असते. प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये स्थिरता नाही. अग्रलेख लिहिणारे कोणी मिळत नाहीत. टीव्ही न्युज चॅनेलचा टीआरपी सध्या घसरून 'युट्यूब' चा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियावर गंडांतर आले आहे. सोशल मीडियामुळे लोकांपर्यंत पोहोचण्याचे सर्वांपुढे फार मोठे लक्ष्य आणि आव्हान आहे असे पत्रकारांना मार्गदर्शन करताना दैनिक प्रहार चे संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी सांगितले.
यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनीही पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुशाली यांनी केले तर आभार प्रदर्शन साप्ताहिक 'आपला भगवा' आणि 'राजमुद्रा' च्या संपादीका सारिका शिंदे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा