डोंबिवली दि.१८ : ठाणे जिल्ह्याचे माहिती अधिकारी मनोज सानप आणि 'जेके स्टार्टअप सपोर्ट सेंटर' चे जयेश खाडे यांच्या उपस्थितीत आज डोंबिवली पश्चिमेकडील जन गण मन शाळेत 'स्टार्टअप सप्ताह' दिनांक १० ते १८ जानेवारी च्या निमित्ताने 'स्टार्टअप कल्पना' स्पर्धेच्या माध्यमातून २५ हुन अधिक ५ वी ते १२ वी च्या शालेय विध्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपापल्या कल्पना 'स्टार्टअप आयडिया कॉम्पेटीशनऑन द स्पॉट फंडिंग' स्पर्धेत उपस्थित केल्या.
एका मुलाने मोटारबाईक वर हेल्मेट नाही घातले तर बाईक सुरूच होणार नाही आणि त्या हेल्मेट मध्ये एक चिप बसवली जाणार असून जर का अपघात झालाच तर त्या अपघाती व्यक्तीच्या घरी तसा संदेश जाऊन त्याला तात्काळ वैद्यकीय मदत मिळून त्याचे प्राण वाचू शकतील अशी कल्पना मांडली. मुलांच्या काही आयडिया ऐकून खूप चांगल्या आयडिया मुलांनी या स्पर्धे दरम्यान मांडल्या तर काही मुलांची उत्पादने सुद्धा तयार आहेत. एक विद्यार्थिनी शाडू मातीच्या सुंदर व सुबक नक्षीदार मुर्त्या व शिल्प तयार करते. त्यांच्या काही वस्तू तयार करून विध्यार्थी उद्योजकता विकास कार्यक्रम करून निदान ते त्यांची शालेय फी व पॉकेटमनी खर्च कसा करता येईल यासाठी जन गण मन शाळा त्यांच्या शालेय कार्यक्रमात त्या मुलांची उत्पादने ठेवून ते विकत घेऊन त्या मुलांना आर्थिक मदत करून गरजू गरीब विध्यार्थी निदान आपली शालेय फी भरू शकतात असे प्रोत्साहन देत असते.
ठाणे जिल्ह्याचे माहिती अधिकारी मनोज सानप आणि 'जेके स्टार्टअप सपोर्ट सेंटर' चे जयेश खाडे यांच्या उपस्थितीत शाळेत झालेल्या या स्टार्टअप कल्पना स्पर्धेत २५ हुन अधिक कल्पना प्रदर्शित करण्यात आल्या. या सर्व २५ मुला-मुलींना त्यांच्या विविध स्टार्टअप कल्पनेच्या प्रात्येक्षिकेतून मनोज सानप, जयेश खाडे, शाळेचे संथापक डॉ.राजकुमार कोल्हे, सचिव डॉ.प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते बक्षीशे तसेच रोख पारितोषिके देण्यात आली. 'स्टार्टअप सप्ताह' निमित्त पूर्ण आठवडा रोज असे कार्यक्रम आयोजण्यात आले असून ठाणे जिल्ह्यामध्ये असे कार्यक्रम जास्तीतजास्त प्रमाणात झाले पाहिजेत असे मत जयेश खडे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडले.
ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी म्हटले की, आज जन गण मन शाळेमध्ये प्राथमीक आणि उच्च प्राथमिक शाळेच्या सुमारे २५ ते ३० विद्यार्थ्यांनी विज्ञान, सोशल व सुरक्षितता या विषयांवर विविध प्रकारचे प्रकल्प त्यांच्या स्वतःच्या सर्जनशील कल्पना व प्रात्यक्षिक करून दाखविले त्याचे कौतुक करत म्हटले की मुलांना आपण संधी दिल्यानंतर ते ज्या पद्धतीने आपली नाविन्यता आपल्या समोर आणतात त्यालाच म्हणतात खरी भारतीय मुलं आणि यालाच म्हणतात भारतीय संस्कृती. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच त्यांचे सहकारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा मुख्य मुद्दा 'स्किल डेव्हलपमेंट' हा विषय असून ह्या सगळ्यांच्या मनात एकचं इच्छा आहे की भारतीय युवकांनी आपल्या भारत भूमीच्या विकासासाठी आपलं स्वतःचं ज्ञान आपल्या देशासाठी वापरणं आणि आपल्या देशाला महासत्ता बनवणं. ज्या दिशेने ही मुलं काम करतात त्या पद्धतीने 'आयआयटी मुंबई' ई-सेलचे मेंटॉर जयेश खाडे ज्या प्रकारे त्यांना सपोर्ट करत आहेत आणि प्रोत्साहन देत आहेत आणि त्यांच्याबरोबर अवधुत सावंत यांच्यासारखे 'राष्ट्रीय पदक विजेते केंद्रीय पत्रकार' त्याच प्रेरणेने या कार्यामध्ये आपला छोटासा सहभाग नोंदवत आहेत ही खूपचं मोठी आणि सकारात्मक बाब आहे. आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांचं सुद्धा या सगळ्या उपक्रमांना महत्वाचा असा सपोर्ट असणार आहे. तर आपणही एक पालक म्हणून आणि या देशाचे नागरिक म्हणून या मुलांना भविष्यामध्ये निश्चित प्रोत्साहन देऊया असं म्हणत शाळेचे मनःपूर्वक अभिनंदन करत शाळेच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा