डोंबिवली दि.५ : कल्याण लोकसभेचे संसदरत्न तसेच लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे येथील 'ज्युपिटर हॉस्पिटल'मध्ये जाऊन हिल लाईन पोलीस ठाण्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात जखमी झालेल्या महेश गायकवाड यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. कल्याण पूर्व येथील शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची अधिकृत माहिती सोमवारी सकाळी शिवसेनेकडून देण्यात आली. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन महेश यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. त्यांच्या भेटीचे फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाले आहेत.
हिललाईन पोलीस ठाण्यात जमिनीच्या वादातून एकत्र जमलेले असताना मुलाला मारहाण झाल्याने संतप्त झालेल्या आमदार गणपत गायकवाड यांनी स्वसंरक्षणाचे कारण सांगून महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यावर शुक्रवारी बेछूट गोळीबार केला होता. यात दोघेही गंभीर रित्या जखमी झाले होते. महेश व राहुल यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी रुग्णालयाला भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील सातत्याने महेश गायकवाड यांच्या तब्येतीची चौकशी करत असून ते रुग्णालयात जाऊन त्यांची पहाणी देखील करत आहेत.
मागील दोन दिवसांपासून महेश यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाकडून दिली जात होती. त्यामुळे महेश समर्थकांची चिंता वाढली होती. सोमवारी सकाळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महेश यांची ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले आहेत. यामध्ये महेश हे खासदारांशी बोलत असल्याचे दिसत आहे. हे फोटो पाहून कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा