डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना विविध खेळांमध्ये आपली कला व प्रतिभा दाखवता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न तसेच लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी त्यांच्या पुढाकाराने आयोजित 'खासदार क्रिडासंग्राम' स्पर्धेला रविवारी साधेपणाने सुरवात झाली. शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या गोळीबार हल्ल्यामुळे या स्पर्धेचा अत्यंत साधेपणाने उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी स्पर्धेच्या ट्रॉफीचेही मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले.
यावेळी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, युवासेना सचिव दिपेश म्हात्रे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, विधानसभा महिला संघटक लता पाटील, अभिजित दरेकर, प्रकाश माने, रवी मट्या पाटील, नितीन मट्या पाटील, अर्जुन पाटील, जितेन पाटील, संतोष चव्हाण, संजय पावशे, रणजीत जोशी, सागर जेधे, सागर बापट, जनार्धन म्हात्रे, राहुल म्हात्रे, रवी म्हात्रे, संदेश पाटील, दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी, महिला आघाडी शहर संघटक स्वाती हिरवे, अवनी शर्मा, दीपाली घरत, ज्येष्ठ बॅडमिंटनपटू श्रीकांत वाड, डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्यासह अनेक नामांकित खेळाडू आणि मान्यवर उपस्थित होते. कल्याण लोकसभा मतदारसंघातील इतर विधानसभा मतदारसंघासह डोंबिवली शहराच्या संतश्रेष्ठ ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रिडा संकुलात या स्पर्धा होत आहेत. या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि दिप प्रज्वलन करून पारंपरिक पद्धतीने या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. तसेच सुप्रसिद्ध रॅपर मिटोराईड छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित शौर्यगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या स्पर्धेचे सुरुवात कुस्तीने करण्यात आली. प्रसिद्ध महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू सिकंदर शेख आणि दिल्लीतील पंजाब केसरी छोटा गणीसोबत या स्पर्धेतील पहिला आणि प्रेक्षणीय सामना खेळविण्यात आला. ज्यामध्ये अवघ्या काही मिनिटांत महाराष्ट्राच्या सिकंदरने छोटा गनीला लोळवत धूळ चारली. आणि प्रेक्षणीय सामन्यात विजयी सलामी दिली. तर त्यापाठोपाठ महाराष्ट्राची कुस्तीपटू उपमहाराष्ट्र केसरी वैष्णवी पाटील आणि शिवांजली शिंदे यांच्यामध्ये महिलांचा सामना खेळवला गेला. ज्यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील मंगरूळच्या वैष्णवी पाटीलनेही साताऱ्याच्या शिवांजलीला काही मिनिटांतच लोळविले आणि विजयी पताका फडकवली. दरम्यान कुस्तीच्या सामन्यानंतर यावेळी उपस्थित मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत कबड्डी, खो-खो आदी स्पर्धांनाही यावेळी प्रारंभ करण्यात आला.
कल्याण लोकसभेचे लाडके संसदरत्न खासदार डॉ.शिकांत शिंदे यांच्या माध्यमातून ह.भ. प. संत सावळाराम महाराज क्रिडा संकुलात खेळवण्यात येणाऱ्या क्रिडा संग्रामात एकूण १६ खेळांचा समावेश करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातुन ४७,००० क्रीडा खेळाडू यांनी या क्रीडासंग्रामात सहभाग घेतला असून त्यापैकी ११ क्रिडा स्पर्धा डोंबिवली एमआयडीसीतील ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रिडा संकुलात खेळवल्या जाणार आहेत असे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. तसेच खासदार क्रीडासंग्राम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांबुरे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा