डोंबिवली दि.२१ : डोंबिवली पूर्वेकडील टाटा पावर गोळवली येथील देशमुख होम्स परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामाला भीषण आग लगल्याची घटना गुरुवारी २१ तारखेच्या पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या ठिकाणी पत्रे ठोकून भंगाराचे गोदाम उभे केले होते. या गोदामामध्ये कापडाच्या चिंध्या, प्लास्टिकच्या बॉटल, पिशव्या, लाकडी सामान मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते.
दोन तासाच्या अथक परिश्रम आणि प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण करण्यात यश
या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच डोंबिवली अग्निशमन विभागाच्या सात ते आठ गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. दोन तासाच्या अथक परिश्रम आणि प्रयत्नांनंतर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा