डोंबिवली : तिरुपती बालाजी देवस्थान देशातील लाखो भक्तांच्या मनातील एक अढळ असे श्रद्धास्थान आहे. मात्र पैसा आणि वेळे अभावी सर्व भाविकांना तिरुपती येथे जाऊन श्री बालाजी यांचे दर्शन घेणे अनेकदा शक्य नसते. या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभेचे लोकप्रिय संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने तसेच तिरुमला तिरुपती देवस्थान आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत भव्य दिव्य स्वरूपात श्री श्रीनिवास कल्याणम् महोत्सवाचे आयोजन रविवार दि. २५ रोजी डोंबिवली येथील प्रिमीयर कंपनीच्या मैदानात संपन्न झाला. यावेळी शहरात महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्राही काढण्यात आली. सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि आमदार दादा भुसे उपस्थित होते.
हजारो डोंबिवलीकरांना तिरुपती बालाजीचे दर्शन प्रत्यक्षात या ठिकाणी करायची संधी मिळाली. संपूर्ण परिसर मंगलमय वातावरण झाले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, भाविकांना तिरुपती बालाजीला जाणं शक्य होत नाही म्हणून हा 'श्री श्रीनिवास कल्याणम् महोत्सव' या ठिकाणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केला, याबद्दल त्यांना धन्यवाद व शुभेच्छा देतो. नवी मुंबईमध्ये आपण सिडकोची जमीन दिली त्याचे भूमिपूजन गेल्या वर्षी केले होते. तिथे देखील आपल्या महाराष्ट्रातील तिरुपती बालाजी यांचे भक्त आहेत त्यांना दर्शनाची संधी मिळेल. या महोत्सववामुळे एक आगळं वेगळं मंगलमय पवित्र वातावरण या डोंबिवली शहराच्या ठिकाणी निर्माण झाले आहे. प्रसंगी सर्व भक्तगण भगवान बालाजीच्या भक्ती मध्ये समर्पित झालेले आहेत म्हणून त्या समस्त भक्तांचे सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो व धन्यवाद देतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा