कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांनी मालमत्ता करापोटी महापालिकेस आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. दिनांक ०३ मार्च २०२४ ते दिनांक ३१ मार्च २०२४ या कालावधीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कर दात्यांसाठी महानगरपालिकेने अभय योजना-२०२४ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमध्ये दिनांक ०३ मार्च २०२४ ते दिनांक ३१ मार्च २०२४ या कालावधीत संपूर्ण थकबाकीसह चालू वर्षाची मालमत्ता कराची व पाणी पट्टीची मागणीची संपूर्ण रक्कम अधिक नियम ४१ खालील शास्ती (दंड/व्याज) ची २५ % रक्कम एक रकमी भरल्यास ७५ % शास्ती (दंड/व्याज) कमी केली जाणार आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी दिनांक ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू असलेल्या अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी या प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा