मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करणारे मनोज जरांगे पाटील यांचा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.कारण,भाजप आमदारांनी जरांगे यांच्याविरोधात विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आर्थिक मदत कुणी केली ? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांनी विधानसभा सभागृहात उपस्थित केली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार, अशी घोषणा फडणवीसांनी विधानसभेत केली आहे. तसेच यामागचे सूत्रधार आम्ही शोधून काढू, असंही फडणवीसांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा