डोंबिवली दि.१२ : कल्याण ग्रामीणचे मनसे पक्षाचे लोकप्रिय स्थानिक आमदार राजु पाटील यांच्या आमदार निधीतून आज निळजे, घेसर, कोळे, लोढा हेवन व अन्य ठिकाणी नविन कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार राजू पाटील यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाला. शिवाय आज दिवसभरात मतदार संघातील अन्य ठिकाणी देखील विकास कामांच्या नियोजित कार्यक्रमानुसार आमदार महोदय आज सकाळ पासूनच व्यस्त असल्याचे दिसून आले.
आज संपन्न झालेल्या भूमिपूजन समारंभात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुरुष आणि महिला पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांची विशेष उपस्थिती लाभली होती. त्यामुळे कार्यक्रमांची शोभा अधिक वाढली शिवाय कार्यक्रम देखील खूपच चांगल्या प्रकारे संपन्न झाला. प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण डोंबिवली ग्रामीण भागातील मुख्य पदाधिकारी यांची उपस्थिती प्रार्थनिय होती. यावेळी उपस्थित कार्यक्रमास मान्यवरांचा यथोचित सन्मान देखील करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा