BREAKING NEWS
latest

गुन्हे शाखा घटक-३ च्या पोलीसांनी पावणे आठ लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडून केले तिघांना अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.३ : महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला अवैध गुटख्याची वाहतुक करणाऱ्या तिघांना गुन्हे अन्वेषण शाखा घटक-३ कल्याणच्या विभागाने बेड्या ठोकून अटक केली आहे. या तिघांचे दोन साथीदार फरार असून यांनी हाजीमंलग रोड कुसवली गावाजवळ अवैध गुटखा कारखाना सुरू केला होता. पोलीसांनी या कारखान्यावर छापा टाकत पावणे आठ लाखाचा राज्यातील प्रतिबंधित अवैध गुटखा जप्त केला आहे. त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन आणि गुटखा बनविणारी मशीनची जप्ती  करण्यात आली आहे. कल्याण गुन्हे घटक-३ विभागाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त (गुन्हे) शिवराज पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली. विराज सिताराम आलीमकर (वय: २४ वर्षे) राहणार. के.सदन बंगला, शिळदिवा रोड, पारसिक बँकेच्या जवळ, शिळफाटा, जि. ठाणे, मोहम्मद उमर अब्दुल रेहमान (वय: ३५ वर्षे) आणि मोहम्मद तारीक अलीकादर खान (वय: २१ वर्षे) राहणार हिरा रेसिडन्सी समोरील चाळीत, खान कंपाऊंड, मुंब्रा शिळ रोड, जि. ठाणे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे असून तिघांकडून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन व वाहनातील अवैध गुटखा असा एकुण ७,५८,१५० किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. 

अटक केलेल्या तिघांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि क्र. ३२६/२०२४ भादंवि कलम ३२८, २७३. १८८ सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील कलम २६ (२). (l), कलम २७(१) सह वाचन ३(१) (zz) (IV), शिक्षा कलम ५९(३) तसेच २६ (२) (lV) सह वाचन कलम ३० (२), (l) व मा. अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांची अधिसुचना क्रमांक असुमाअ /अधिसुचना - ५२४/७. दि.१५/०७/२०२२ च्या अधिसुचनेची अवज्ञा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बदलापुर पाईपलाईन रोड येथील निसर्ग हॉटेल जवळ, खोणी फाटा डोंबिवली पूर्व येथे चारचाकी वाहनाने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अवैध गुटखा वाहतुक करून घेवून जाणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखा घटक-३ च्या अन्वेषण विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलीसांनी सदर ठिकाणी सापळा रचला. काही वेळाने बदलापुरच्या दिशेकडून काटईनाका दिशेकडे जाणारे एक चारचाकी वाहन थांबवून पोलीसांनी वाहन व गुटखा जप्त केला. पोलीस कस्टडी रिमांड घेऊन तपास केला असता हे तिघे व दोन साथीदार यांनी सुरू केलेल्या कल्याण येथील हाजीमंलग रोड कुसवली गावाजवळ अवैध गुटखा बनविण्याचा कारखान्यावर छापा मारला. या कारखान्यातील अवैध गुटखा बनविण्याकरीता लागणारे साहित्य, २ मोठ्या मशिन व इतर कच्चा माल, सुंगधीयुक्त सुपारी, विमल पान मसाला, राजनिवास पानमसाला तसेच जेड एल- ०१ जाफरानी जर्दा तंबाखु व इतर कच्चा माल असा सुमारे १७ लाख रुपये किंमतीचा मुदद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त गंजाबराव उगले, पोलीस उप-आयुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे (गुन्हे शाखा) ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखा घटक-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोनि राहुल मस्के, सपोनि संदीप चव्हाण, संतोष उगलमुगले, पोउपनि संजय माळी, पोहवा प्रशांत वानखेडे, दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, विश्वास माने, किशोर पाटील, रमाकांत पाटील, विलास कडू, अनुप कामत, पोना. सचिन वानखेडे, पोशि. गुरुनाथ जरग, दिपक महाजन, गोरक्ष शेकडे, विजेन्द्र नवसारे, रविन्द्र लांडगे, मिथुन राठोड, महिला पोहवा. मेघा जाने, मपोशि. मंगला गावित, चालक पोहवा. अमोल बोरकर यांनी यशस्वी रित्या केलेली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत