BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' संस्थेचे सर्वेसर्वा डॉ. राजकुमार कोल्हे यांना 'टेडएक्स टॉक' (TEDx talk) मधे दिल्ली येथे सस्नेह निमंत्रण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी अथक प्रयत्नांची गरज असते. स्वप्न साकारण्यासाठी त्यागाची भावना असावी लागते. वास्तववादी जीवन आणि स्वप्नवत जीवन ह्या दोन्हींमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. परंतू अशाच वास्तववादी संघर्षमय जीवनातून स्वप्न साकारत एकेक पाऊल पुढे टाकून यशस्वीरीत्या वाटचाल करणारे व्यक्तिमत्व म्हणजे 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे होय.
दिनांक ३ मार्च २०२४ रोजी दिल्ली एन सी आर मध्ये आयोजित केलेल्या जागतिक दर्जाचे व्यासपीठ असलेल्या 'टेडएक्स टॉक'(Tedx talk) मधे संपूर्ण महाराष्ट्रातून डॉ. राजकुमार कोल्हे यांना आमंत्रित करण्यात आले होते. काश्मिरपासून ते कन्याकुमारी पर्यंतच्या सर्वोत्कृष्ट नामांकित व्यक्तींना आमंत्रित केले गेले होते. परंतु जसा इतिहास सांगतो "दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा" ह्या उक्तीप्रमाणे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी महाराष्ट्राचा झेंडा दिल्लीत फडकवला तो केवळ आपल्या बाणेदार वक्तृत्वाने. दिल्ली येथे एन् सी आर मधील मोठमोठ्या  होर्डिंगसवर फोटो लावण्यात आले होते. केवळ पंधरा मिनिटांच्या कालावधीत कोणत्याही व्यक्तीचे अथवा संस्था, ठिकाण चा उल्लेख न करता जीवनाचा प्रवास, स्वप्नपूर्ती, स्वतःवरचा विश्वास, कृती आणि ध्येय साध्य ह्या विषयावर अस्सलिखित भाषण देऊन उपस्तिथांकडून दाद मिळवली. टेड एक्स टॉक चे सन्मानचिन्ह देऊन डॉ. राजकुमार कोल्हे यांनी गौरविण्यात आले. प्रत्येक क्षणाच्या संघर्षात आणि क्षणी सुखात बरोबरीने कायम साथ देणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी व संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनीही हजेरी लावून आनंदाश्रुने डॉ. राजकुमार कोल्हे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
'टेड एक्स' (TEDx) हे असे व्यासपीठ आहे ज्यामधे सत्यता आणि चार कोटी सदस्यांसाठी ओळखले जाते. बिल गेट्स पासून ते शाहरुख खान पर्यंत अनेक जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींचा गौरव केला जातो. अनेक पुरस्कार, प्रमाणपत्रे, सन्मानचिन्ह मिळालेले असले तरी जागतिक पातळीवर चे टेड एक्स (TEDx) कार्यक्रमाचे चषक हे आमच्यासाठी व आमच्या 'जे एम एफ' परिवारासाठी विशेष सन्मानचिन्ह आहे असे भावनिक उद्गार डॉ. राजकुमार कोल्हे यांनी काढले व कृतज्ञता व्यक्त केली./हजारो उपस्थितांच्या टाळ्यांनी सभागृह दुमदुमला. सभागृहातून बाहेर पडताच माध्यमांनी डॉ. राजकुमार कोल्हे यांची मुलाखत घेतली. ४ मार्च रोजी सकाळी राष्ट्रपती भवनात जाऊन भारताच्या आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी जी मुर्मु यांना 'जे एम एफ' वास्तूचे उद्घाटन साठी डॉ. राजकुमार कोल्हे व सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आमंत्रण दिले. ज्यांच्या जीवनात संघर्ष नाही ते कम नशिबी आहेत असे समजावे, संघर्षा शिवाय जीवन व्यर्थ आहे, अन्यथा त्यांनी शपथ तोडली नाहीतर ते रणांगणावरून माघारी फिरले. अशा सुंदर आणि स्फूर्तिदायी टीपणी वर डॉ. राजकुमार कोल्हे आणि डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत