डोंबिवली : गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण चे पोलीस कोळसेवाडी पो.स्टे. गु.रजि.नं. ४९५/२०२४ भा.दं.वि. कलम ३८१ या गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना दिनांक १३/०४/२०२४ रोजी गुन्हे घटकातील पोशि. गोरक्ष शेकडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी १) सुनिल प्रकाश कुंदल, राहणार: बॅरेक नं. १९३४, रूम नं. १३, ओ.टी.सेक्शन, उल्हासनगर-५ जि. ठाणे, यास गुन्हे घटकातील पथकाने सापळा रचुन उल्हासनगर येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडे केलेल्या सखोल तपासात गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल (वेगवेगळया कंपनीच्या व किंमतीच्या दारूच्या सिलबंद बाटल्या) आपसात संगनमत करून ढाब्यावर व दुकानात विक्री करण्यात सहभागी असलेले आणखी ०३ आरोपी २) सुरेश प्रितम पाचारने (वय: २४ वर्षे) राहणार: विठ्ठलनगर झोपडपट्टी, गणपती मदिंराच्या मागे, उल्हासनगर-०५, ३) नरेश राघो भोईर (वय: ३९ वर्षे ) राहणार: जिजाऊ बंगल्याचे बाजुला नरेश किराणा दुकानाच्या वरती, नेवाळी गाव, ता. अंबरनाथ जि. ठाणे, ४) सागर श्रावण पाटील (वय: २४ वर्षे) धंदा: जय भोलेनाथ ढाबा, राहणार: मांगरूळ गाव, ता: अंबरनाथ जि: ठाणे यांना पकडून ताब्यात घेण्यात आले.
सदर पकडण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मालातील दारूच्या सिलबंद बाटल्या व रोख रक्कम असा एकुण २१,६५५/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेले ०४ आरोपी व हस्तगत करण्यात आलेला मुददेमाल पुढील तपासकामी कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कारवाई गुन्हे शाखा घटक-३ कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा. दत्ताराम भोसले, गोरक्ष शेकडे, दिपक महाजन, बालाजी शिंदे, विलास कडू, गुरुनाथ जरग, चालक अमोल बोरकर, या अंमलदारांनी यशस्वीरित्या केलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा