BREAKING NEWS
latest

दिल्लीतील राष्ट्रीय युनिफाईट मार्शल आर्ट अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघ प्रथम..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

 निजामपूर: दिल्ली येथे दि.२३ व २४ एप्रिल दरम्यान युनिफाईट मार्शल आर्ट अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. यात ५२ सुवर्णपदकं, ३३ रौप्यपदकं, ५ कास्यपदकांसह महाराष्ट्र युनिफाईट संघाने प्रथम क्रमांक पटकवत अजिंक्यपद मिळविले. महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणुन सुनिल वडके, रविंद्र म्हात्रे, सागर कोळी, विनोद कुंजीर, प्रतिक कारंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

२२ व २३ एप्रिल रोजी ८ व्या नॅशनल युनिफाईट चॅम्पियनशीप २०२४ दिल्ली येथे झालेल्या या युनिफाईट मार्शल आर्ट संघात डोंबिवलीची लाडकी लेक सई दिनकर सोमासे हिने या स्पर्धेमध्ये दिल्ली येथे जाऊन काराटे फाईट मधे रौप्यपदक मिळवले. तसेच अनेक खेळाडूंनी सुवर्णपदकं, रौप्यपदकं, कास्यपदकं मिळवली आहेत. तसेच रशिया येथे होत असलेल्या चॅम्पियनशीप मध्ये सई ची निवड करण्यात आली आहे. अनेक मान्यवरांकडून सई सोमासे हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत