BREAKING NEWS
latest

राष्ट्रासाठी मतदान करा व मुलासहित सेल्फी फोटो काढा, उपक्रम 'जे एम एफ' जन गण मन शाळेत सुरू..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

 डोंबिवली दि.२६ :  राष्ट्रीय एकात्मता, कर्तव्य आणि जबाबदारी या सर्वांची सांगड म्हणजेच  अधिकार आणि कायद्याला धरून मतदानाचा हक्क बजावणे. 'जे एम एफ' संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी कायमच शैक्षणिक जबाबदारीचे भान राखून सामाजिक जबाबदारी चे देखील कर्तव्य पूर्ण करण्याचे खंबीर नेतृत्व हाती घेतले आहे.
दिनांक २६ एप्रिल रोजी 'जन गण मन' शाळेच्या मधुबन वातानुकुलीत दालनामधे सर्व पालकांची 'जागृत मतदार' व मतदान करण्याचे आवाहन म्हणून सभा आयोजित केली होती. असंख्य पालक वर्ग या सभेला उपस्थित होता. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी स्वतः मतदान विषयीची प्रतिज्ञा शपथ ग्रहण करून पालकांकडून  देखील प्रतिज्ञा ग्रहण करून घेतली आणि सर्व पालकांना आपल्या स्वतःच्या पाल्यासोबत सेल्फी फोटो काढून घेण्यासाठी प्रोत्साहित केले .ज्या पालकांनी अशा प्रकारे सामाजिक जबाबदारी मानून कार्य करेल त्यांच्या पाल्याला अभ्यासेतर उपक्रम म्हणून "O" (ओ) ग्रेड देऊन सन्मानित केले जाईल. तसेच जे पालक त्यांच्या मूळ गावी आहेत व मतदान करण्यासाठी येऊ शकत नाहीत त्यांनी देखील तेथूनच मतदान ओळखपत्र व मुलांसोबत सेल्फी फोटो घेऊन पाठवून द्यावा असे आवाहन केले. 'जन गण मन' शाळेच्या वेब साईट वर सर्वांचे घेतलेले फोटो प्रदर्शित केले जातील. तरी सर्वांनी मिळून या उपक्रमाला एकात्मताने पुढे आणा असे आवाहन केले.
लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेली राजकीय चळवळ. यामध्ये प्रत्येक जण आपापले मत ठामपणे मांडू शकतो, बोलू शकतो. येणाऱ्या पुढच्या पिढीने देखील लोकशाही आघाडी साठी कार्यरत असावे असे सांगून डॉ. राजकुमार कोल्हे यांनी मतदान जागरूकता निर्माण केली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत