मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यांनी भारतातील तरुणांकडे लक्ष द्यावे. हे तरुण उद्याच्या देशाचं भविष्य आहे. आता फक्त १० वर्ष आहे. नंतर देश वयस्करांचा होईल, असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी मनसेची लोकसभा निवडणुकीबाबात आपली भूमिका देखील स्पष्ट केली.
येणाऱ्या लोकसभा निवडणुका देशाचं भविष्य ठरवणाऱ्या आहेत. महाराष्ट्रला मोठा वाटा हवा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मला अपेक्षा आहेत. मी फक्त मोदींसाठी पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट सांगितलं की मला वाटाघाटी नको. राज्यसभा नको किंवा लोकसभा ही नको. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप- शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे.. 'आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नी फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे. माझी महाराष्ट्राकडून अपेक्षा आहे की राजकीय व्याभिचाराला राजमान्यता देऊ नका, पुढील दिवस भीषण आहेत. अन्यथा चुकीचा पायंडा पडेल.'
यावेळी राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुका लढवण्याची घोषणा केली. माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, उत्तम संघटना बांधणी करा, मतदारसंघ बांधा. विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. विधानसभा निवडणुकीत महायुतीत असणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट बघायला मिळणार असल्याचं आता चित्र स्पष्ट झालं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा