डोंबिवली दि.०३ : कोळशेवाडी पोलीस ठाणे हददीत सुचक नाका, कल्याण पुर्व येथे मयत इसम सुरज सोमा हिलम (वय: २५ वर्षे) यास २० ते २५ वर्षे वयाच्या अनोळखी ०६ इसमांनी लाकडी फळीने, झाडुने, व दगड फेकुन गंभीर जखमी करून जिवे ठार मारल्या बाबत मयत इसमाचा भाऊ पिंट्या सोमा हिलम याच्या फिर्यादीवरून कोळशेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ४६८/२०२४ भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्ह्याच्या घटनास्थळी इकडील घटकातील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी तात्काळ भेट देवुन नमुद गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले.
घटनास्थळावरील प्राप्त सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले. त्यानंतर पोलीस अंमलदार मिथुन राठोड यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे ०२ संशयीत आरोपी व ०१ विधीसंघर्षित बालक हे सुचक नाका, रिक्षा स्टॅन्ड जवळ कल्याण पुर्व येथे येणार आहेत. सदर बातमीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक-३ चे पोलीस अधिकरी व अमंलदार यांनी सापळा कारवाई करून सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपी नामे १) रूपेश महादेव कांबळे (वय: १९ वर्षे) रा. महात्मा फुले नगर झोपडपट्टी, सुचक नाका, कोळशेवाडी कल्याण पुर्व, २) मोहन रमेश बनसोडे (वय: १८ वर्षे) रा. महात्मा फुले नगर झोपडपट्टी, सुचक नाका, कोळशेवाडी कल्याण पुर्व यांना तसेच ०१ विधीसंघर्षित बालक यांना घेवुन गुन्हे शाखा युनिट-३ कार्यालयात आले.
त्यानंतर संशयीत आरोपी व विधिसंघर्षित बालक यांचेकडे सदर गुन्ह्याबाबत अधिक विचारपुस करता ताब्यात असलेला संशयीत इसम मोहन रमेश बनसोडे याने माहिती दिली की, त्याच्या मामास यातील मयत इसम सुरज सोमा हिलम याने दारू प्यायला बसले असताना उसणे घेतलेले पैसे देणे-घेण्यावरून मारहाण केल्याचा राग मनात धरून वरील संशयीत आरोपी रूपेश महादेव कांबळे व मोहन रमेश बनसोडे व एक विधिसंघर्षित बालक तसेच त्यांचे अजुन साथीदार आरोपी यांनी मिळुन मयत इसम सुरज सोमा हिलम यास लाकडी फळीने, झाडुने, व दगड फेकुन मारून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले असल्याचे सांगितले. त्यांनतर नमुद संशयीत आरोपी व विधिसंघर्षित बालक यांनी वर नमुद गुन्हयात सहभाग असल्याची त्यांनी कबुली दिल्याने तिघांना पुढील कारवाई करीता कोळशेवाडी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. अशा प्रकारे गुन्हे शाखा घटक-३ कल्याणचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी २४ तासाच्या आत तपास करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे
प्रस्तुत यशस्वी कामगिरी मा.पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), मा.शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) व मा. निलेश सोनावणे सहा पोलीस आयुक्त, (शोध-१) गुन्हे, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सपोनि. संदिप चव्हाण, पोहवा. दत्ताराम भोसले, अनुप कामत, किशोर पाटील, पोना. दिपक महाजन, सचिन वानखेडे, पोकॉ. मिथुन राठोड, विनोद चन्ने, गुरूनाथ जरग, गोरक्ष शेकडे, रविंद्र लांडगे, चालक पोहवा. अमोल बोरकर यांनी यशस्वीरित्या केलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा