डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील नवापाडा येथे कल्याण-डोंबिवली स्थायी समिती सभापती नगरसेवक जनार्दन परशुराम म्हात्रे यांच्या १,०१,११,१११ (एक करोड एक लाख अकरा हजार एकशे अकरा) रुपयांच्या देणगीतून 'श्री रागाई माता मंदिर' उभारण्यात आले असून देवीच्या गाभाऱ्यातील सुबक नक्षीकाम चांदीचे केले आहे. त्याचा सर्व खर्च जनार्धन म्हात्रे यांच्या देणगीतून करण्यात आला आहे. डोंबिवलीत आगरी कोळी समाजाचे बहुतांश धनधांडगे राहत असून अशा सढळ हाताने देणगी स्वरूपाने आजवर इतकी मोठी रक्कम मंदिरासाठी दिली गेली नसल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
कल्याण-डोंबिवली च्या 'ह' प्रभाग क्षेत्र सभापती नगरसेविका रेखा जनार्दन म्हात्रे, प्रियदर्शनी कुंदन म्हात्रे, अक्षय जनार्दन म्हात्रे तसेच कृतज्ञा अक्षय म्हात्रे यांच्या तर्फे श्री रागाई माता मंदिराला विशेष हातभार लावून हे मंदिर चांदीच्या नक्षीकामाने सुशोभित करण्यात आले असून त्यांचे डोंबिवलीकरांकडुन तोंडभरून स्तुती व कौतुक केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा