कल्याण दि.१९: उद्या दि. २० मे २०२४ रोजी होत असलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी आज कल्याण मधील जाईबाई शाळा, मॉडर्न कॉलेज, राजभर स्कुल व परिसरातील इतर मतदान केंद्रांतील व्यवस्थेबाबत पाहणी केली.
मतदान केंद्रात प्रामुख्याने मतदान अधिकारी, कर्मचारी तसेच मतदारांसाठी स्वच्छ शौचालयांची व्यवस्था, त्याचप्रमाणे मतदान केंद्रा बाहेर उन्हाची तीव्रता लक्षात घेता मतदान केंद्रात पिण्याच्या पाण्याची सोय, मंडपाची व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची तसेच व्हीलचेअरची व्यवस्था योग्य रीतीने असल्याबाबत त्याचप्रमाणे मतदान केंद्राभोवतालचा परिसर स्वच्छ असल्याबाबत पाहणी करीत, मतदारांसाठी सर्व मतदान केंद्रे सुसज्य असल्याची आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी स्वतः खातरजमा केली. महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांनी उद्या म्हणजे दिनांक २० मे रोजी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहनही आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी यावेळी केले.
यासमयी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त धैर्यशील जाधव, विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव, कार्यकारी अभियंता जगदिश कोरे, ५/ड प्रभागाचे सहा.आयुक्त धनंजय थोरात उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा