डोंबिवली : डोंबिवलीतील 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट' आयोजित 'जॉब फेअर' हा बहुचर्चीत नोकरीची संधी देणारा उपक्रम बुधवार, दिनांक २२ मे २०२४ रोजी 'ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल', डोंबिवली येथे संपन्न झाला. जवळपास १७०० लोकांनी त्यासाठी नोंदणी केली होती. एकूण ३३ कंपनीचे प्रतिनिधी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी आले होते. एकूण २४३ लोकांना नोकरी मिळाली. कोणतेही शुल्क न आकारता केवळ सेवाभावी वृत्तीतून सदर उपक्रम आयोजित केला गेला होता असे प्रकल्प प्रमुख प्रा.डॉ.विनय भोळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट' तर्फे नेहमीच असे लोकोपयोगी स्तुत्य उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात असं क्लबचे अध्यक्ष रघुनाथ लोटे यांनी सांगितले. पुढील वर्षी अजून जास्त लोकांना कसा रोजगार मिळवून देता येईल असा आमचा प्रयत्न असेल असे प्रतिपादन मानद सचिव डॉ. महेश पाटील यांनी केले. ब्लॉसम इंटरनॅशनलच्या सुसज्ज सभागृहात रोटरी प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी आणि माजी प्रांतपाल डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी 'जॉब फेअर'चं उदघाटन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
भारत सरकारच्या सक्षम योजनेतर्फे सदर जॉब फेअर रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे घेण्यात आल्यामुळे 'सक्षम' अश्विन श्रीवास्तव आणि दयाल कांगणे यावेळी पूर्णवेळ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा