BREAKING NEWS
latest

"निर्धार-एक हात आपुलकीचा" संस्थेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला चांगलाच प्रतिसाद!


विशेष प्रतिनिधी
रविवार दि.२६ मे २०२३: जोगेश्वरी (पूर्व), मुंबई येथील अरविंद गंडभीर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या "निर्धार-एक हात आपुलकीचा" या सामाजिक संस्थेने अरविंद गंडभीर हायस्कूल येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

दर सहा महिन्यांनी निर्धारतर्फे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. निर्धारच्या आठव्या रक्तदान शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. तनुजा कुमार, भारतीय आयुर्विमा महामंडळ मधून वरिष्ठ मंडल प्रबंधक म्हणून सेवानिवृत्त झालेले व्यक्ती लाभली होती. 

सकाळी ९ वाजता पाहुण्यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शाल, व श्रीफळ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर रक्तदात्यांचा ओघ शिबिराकडे वाढू लागला. सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळात एकूण ५९ इच्छुकांनी आपली नावे नोंदवली. त्यापैकी काहींना आरोग्याच्या कारणामुळे रक्तदान करता आले नाही.

एकूण ५२ रक्तदात्यांनी आपले रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले.मे महिन्याचे सुट्टीचे दिवस, त्यामुळे बहुसंख्य लोक बाहेरगावी गेलेले असतानाही रक्तदात्यांची ही उपस्थिती कौतुकास्पद होती. रक्तपेढी आणि हॉस्पिटल्समध्ये सध्या जाणवणारा रक्ताचा तुटवडा काही अंशी भरून काढण्यात आजचे रक्तदान शिबिर नक्कीच उपयुक्त ठरेल असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच, शिबिराला नवोदित रक्तदात्यांनी आवर्जून रक्तदान केले, हे पाहता निर्धारतर्फे रक्तदानासाठी समाजात करण्यात येणारी जागृती नक्कीच लोकांपर्यंत पोहोचत आहे असे दिसून येते आणि निर्धार आयोजित यापुढील रक्तदान शिबिरेही अशीच उत्तरोत्तर यशस्वी ठरले असेही काही कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

हे रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यात "निर्धार-एक हात आपुलकीचा" या समाजसेवी संस्थेचे सर्व कार्यकर्ते, व मातोश्री मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे सर्व प्रतिनिधी यांनी मोलाचा हातभार लावला. शिबिराच्या समारोपाला प्रायोजक, निर्धार चे हितचिंतक, आणि जे.इ.एस चे विश्वस्त आणि रक्तदाते  यांचे निर्धारतर्फे आभार मानण्यात आले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत