गुहागर तालुक्यातील नवतरुण विकास मंडळ, पश्चिम मोरे वाडी (शीर) येथील ग्रामस्थांनी प्रत्येकाला आपलासा वाटणारा, अतिशय मितभाषी, निगर्वी आणि माणसातला देवमाणूस, मातृहृदयी व्यक्तिमत्व लाभलेले युवा समाजसेवक संतोष जैतापकर यांच्याकडे सार्वजनिक सभागृह जवळ बसविण्यासाठी एलईडी सोलर लाईटची मागणी केली होती. दिवसेंदिवस विजेचे दर वाढत असल्यामुळे साहजिकच वाढीव वीज बिलाची समस्या प्रत्येकाला येते व आपल्या खिशावर त्याचा आर्थिक दृष्टिकोनातून खूप विपरीत परिणाम होतो. त्यामुळे सोलर एनर्जी अर्थात सौर उर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर केला तर विज बिल कमी ठेवण्यास किंवा शून्यावर आणण्यास आपल्याला मदत होऊ शकते.
स्थानिक ग्रामस्थांची ही गरज लक्षात घेत युवा समाजसेवक संतोष जैतापकर यांनी स्वखर्चाने या मंडळाची मागणी पूर्ण केली. या मंडळाचे अध्यक्ष श्री.रमेशजी मोरे व मंडळाचे पदाधिकारी परेश गणपत मोरे यांच्याकडे हे एलईडी सौर लाईट श्री.जैतापकर यांनी सुपूर्द केले. याबद्दल या मंडळातील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा